धुळे : खून करून पळून जाणाऱ्या चौघांना 24 तासात अटक

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – उल्हासनगर येथे एकाचा खून करून खासगी ट्रॅव्हल्सने धुळे मार्गे मध्य प्रदेशात पळून जाणाऱ्या चौघांना धुळे स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केले आहे. या चौघांनी उल्हासनगर येथे दीपक भोईर याचा खून केला होता. धुळे स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून चौघांना अटक करून उल्हासनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई मोहाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल द्वारकाजवळ असलेल्या पेट्रोल पंपाजवळ आज पहाटे करण्यात आली आहे.

नरेश रामसिंग चव्हाण, योगेश सुभाष लाड, राजू मनोहर कनोजीया, अनिकेत विठोबा क्षिरसागर (सर्व रा. उल्हासनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. उल्हासनगरमध्ये खून करून चार आरोपी धुळे मार्गे मध्य प्रदेशात एका खासगी बसमधून जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी हॉटेल द्वारकाजवळ असलेल्या पेट्रोल पंपाजवळ सापळा रचला. पहाटे पोलिसांनी खासगी बसचा पाठलाग करून बस थांबवून बसची झडती घेतली. त्यावेळी संशयीत चार आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना मोहाडी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्यांनी दीपक भोईर याचा खून केल्याची कबूली दिली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधिक्षक डॉ. राजू भुजबळ, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व यांचे पथकातील पोलीस नाईक प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, पोलीस कॉन्स्टेबल रविकिरण राठोड, विशाल पाटील, तुषार पारधी, उमेश पवार, चालक पोलीस नाईक विलास पाटील, केतन पाटील यांनी केली.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like