धुळे : बोरीपाणी झोपडीतुन लाखो रुपयांचा बनावट मद्यसाठा जप्त, सांगवी पोलिसांची कारवाई

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबई आग्रा महामार्गावर दोन राज्याच्या सीमेवर असलेल्या गाव परिसरात मोठ्या प्रमाणात मद्यसाठा तयार केला जातो. या अगोदरही नाशिक आयुक्त लवंगारे यांचे पथकाने मोठी कारवाई करत बनावट लाखो रुपयांचे स्पिरीट व मद्यसाठा जप्त केला. परंतु पोलीस, राज्य उत्पादन शुल्क पथकाचे हाती मुख्य मोहरा लागतच नाही. चालक, सहचालक, मजुर यांचेवरच कारवाई होते. जिल्ह्यात बनावट विदेशी दारुचा महापुर वाहतो असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

आज रविवारी शिरपुर तालुक्यातील सांगवी गावा जवळील पाड्यावर बनावट विदेशी मद्यसाठा घरात तयार केला जात आहे अशी गोपनिय माहिती पो. नि. अभिषेक पाटील यांना मिळाली. त्यांनी एक पोलीस पथक तयार करुन मौजे बोरपाणी येथे पथकाला कारवाई करण्यास पाठविले. काही वेळांनी पथक बोरपाणी गावात पथक पोहचले. झोपडीत दोन व्यक्ती स्पिरटचे मिश्रण करुन बनावट दारुसाठा करताना दिसले. यातील खबरीने माहिती दिलेल्या वेस्ता पवार याला झोपडीत जाऊन पकडण्याचा प्रयत्न पोलीसांनी केला. परंतु तो पाठीमागील दाराने लांब जंगल भागात पळून जाण्यात यशस्वी झाला.

पोलीसांनी झोपडीत झडती घेतली असता. घरात स्पिरटच्या २०० लिटरचे प्लास्टिकचे दोन ड्रम मधुन प्रत्येकी १८० मिली स्पिरीट रसायन ४ स्वच्छ काचेच्या बाटलीत भरुन देशी दारु टँगो पंच कंपनीची १८० मिली मापाची १ बाटली व प्रेसीडेन्ट ५००० सुपर स्ट्रॉंग बीयर कंपनीची ६५० मिली मापाची १ बाटली सिए सँपल साठी काढुन पंचनामा करुन खैरनार यांनी सिल केले. घराची झाडाझडती घेतली असता घरात २९,९०७० रुपये बहिणीकडून आणले होते ते खातरजमा करुन बहिणीकडे रोख रक्कम देण्यात आली.

बोरीपाणी गावात वेस्ता पवार याचे राहते घरात स्पिरीट (रसायन), देशी, विदेशी दारु टँगो पंच व प्रेसिडंन्ट ५००० सुपर स्ट्रॉंग बीयर असा गुन्हाचा माल अवैध विक्रीच्या उद्देशाचे ठेवलेला आढळुन आला. एकुण किंमत १,११,६०० रुपयांचा माल जप्त केला म्हणुन सांगवी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक विश्वास पांढरे यांच्या मार्गदर्शनाने सांगवी पो. नि. अभिषेक पाटील व पोलीस पथकातील कर्मचारी यांनी हि कामगीरी केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त