पुरग्रस्तांना धुळे मोटर परिवहन विभाग पोलीस कर्मचारीचा मदतीचा ‘हात’

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात अतिवृष्टीने सर्वत्रच हाहाकार माजला. प्रत्येक ठिकाणी सामान्य नागरिकांच्या हाकेला पोलीसांनीच मदत केली. पोलीस दादा म्हणाले की चांगल्या चांगल्यांच्या मनात एकदम धडकी भरते. परंतु पोलीस दादा कडून मदतीचा हात हि माणसातील एक माणुसकीचा भाव दिसुन येतो. कोल्हापुरात पुराने मोठा फटका बसला. पुरग्रस्तांना मदतीची हाक सगळीकडुन केली जात आहे.

धुळ्यातुन आपणही मदतीसाठी पुढाकार घेत कोल्हापुर, सातारा, सांगली पुरग्रस्त नागरिकांसाठी पोलीस मुख्यालयातील सेवानिवृत्त व चालक पोलीस कर्मचारी यांचेकडुन श्रावण महिन्यात सत्यनारायण पुजा, महाप्रसाद मोठ्या प्रमाणात सालाबादाप्रमाणे केला जातो. यंदा तो सगळा खर्च पुरग्रस्तांना मदत म्हणुन द्यायचा निर्णय घेतला.

जिल्हा पोलीस अधिक्षक विश्वास पांढरे, स्था.गु.शा.पो.नि.हेंमत पाटील यांचेसह मोटर वाहन सेवा निवृत्त व चालक पोलीस कर्मचारी यांनी 25,000 हजार रुपयांची मदत धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये देत पोलीस दादांनी खारीचा वाटा उचलत पुरग्रस्तांना मदत केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –