विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे पोलिसांचे अतिसंवेदनशील भागातून शक्तिप्रदर्शन

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुशंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहुन नागरीकांनी भयमुक्त वातावरणात निवडणुक पार पडावी याकरिता केंद्रीय औद्योगीक सुरक्षा बल, आरसीपी पथक, शहर पोलीस हद्दीतील स्थानिक पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड यांचे संयुक्त विद्यमानाने आज शुक्रवारी सायंकाळी शहर पोलीस स्टेशन हद्दीत साक्री रोड परिसरातील अतिसंवेदनशील भाग मोगलाई, कुमारनगरातून पोलीसांतर्फे रुटमार्च काढण्यात आला.
Dhule Police
नागरीकांनी भयमुक्त रहावे याकरिता हे आयोजन करण्यात आले होते. हा रुटमार्च जिल्हा पोलीस अधिक्षक विश्वास पांढरे यांचे मार्गदर्शनाखाली काढण्यात आला. उपविभागिय पोलीस अधिकारी सचिन हिरे, डी.वाय.एस.पी. अनिल माने, पो.नि. दुर्गेश एम. तिवारी, सी.आय.एफ. चे पो.नि. मनोज ठाकुर, मिलींद सोनवणे, सायसिंग पावरा, तुषार पोतदार, मनोज दाभाडे सी.आय.एस.एफ. चे कर्मचारी, पोलीस कर्मचारी, होमगार्ड कर्मचारी असे 250-300 जण सहभागी झाले होते.

Visit : Policenama.com