अतिसंवेदनशील परिसरातून धुळे पोलिसांचे शिस्तबध्द पथसंचलन

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – गणोशोत्सव 2019 सांगतेसाठी अनंत चतुर्दशी विसर्जन मिरवणूक मार्ग व अतिसंवेदनशील भागात कायदा सुव्यवस्था शहरात आबाधित रहावी यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.

शहरात आज मंगळवारी जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने कायदा सुव्यवस्था आबाधित रहावी या करीता जिल्हा पोलीस दल सज्ज झाले असून जुने धुळे खुनी मशीद पासून पोलीस दलाने रुट मार्च काढला.
Dhule-Police

बँण्डच्या धुन वाजवत पोलीस दलाने शहरातील सुभाष चौक, ग.न.6,7, चर्नी रोड, पाचकंदिल चौक, शहर पोलीस चौकी, सराफ बाजार, कराचीवाला चौक, फुलवाला चौक, मार्गाने शिस्तबध्द पध्दतीने पथसंचलन करत नागरीकांनी भयमुक्त रहावे कुठल्या परिस्थितीचा सामना करण्यास पोलीस दल सज्ज आहे असा संदेश देत जनजागृती करत गांधी चौकात पथसंचलनाचा समारोप करण्यात आला.

जिल्हा पोलीस अधिक्षक विश्वास पांढरे यांच्या मार्गदर्शनाने हे पथसंचलन करण्यात आले.

जिल्हा पोलीस दल विसर्जन बंदोबस्त सज्ज झाला आहे. यात जिल्हा पोलीस अधिक्षक विश्वास पांढरे, अप्पर पोलीस अधिकारी डॉ.राजु भुजबळ, उपविभागिय पोलीस अधिकारी सचिन हिरे, पो.नि.संदिप सानप, पो.नि.गणेश चौधरी, पो.नि संगिता राऊत यांचेसह 12 पोलीस अधिकारी, 139 पोलीस कर्मचारी, 173 होमगार्ड, 1एस आर पी प्लाटुन, 1 आर सी पी प्लाटुन बँण्ड पथक सहभागी आहे.