Coronavirus Lockdown : विनाकारण शहरात मोटारसायकल वर भटकणाऱ्या नागरिकांच्या मोटरसायकल व कार पोलीसांनी केल्या जप्त

पोलीसनामा ऑनलाइन –  देशात लॉक डाऊन परिस्थिती असताना धुळे शहरात रस्त्यावर यात्रा भरल्या सारखे चित्र पहायला मिळत आहे.कोरोना पार्श्र्वभूमीवर हे लॉक डाऊन महत्त्वाचे असल्याने नागरीक मात्र याकडे दुर्लक्ष करताना दिसत असल्याने आज मंगळवार सकाळ पासून शहरातील विविध पोलीस स्टेशन हद्दीतील रस्त्यावर विनाकारण थांबलेल्या नागरिकांना व विनाकारण शहरात मोटरसायकल व सायकलवर न भटकणाऱ्या नागरिकांनी पोलीसांनी चांगलाच धडा शिकवला काही नागरीकांना तर काठीचा प्रसाद दिला तर विनाकारण मोटरसायकलवर फिरणारे नागरीकांचे दुचाकी वाहन पोलीसांनी जप्त केले.

यात शहर पोलीस ठाण्यात 80 मोटरसायकल व कार ताब्यात घेण्यात आली.आझाद नगर पोलीस ठाण्यात 29 मोटरसायकल, देवपूर पोलिस ठाण्यात 17, पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात 17, मोहाडी पोलिस ठाण्यात,02 तालुका पोलीस ठाण्यात दुपार पर्यंत कारवाई बाबत माहिती कळु शकली नाही.

शहरातील तीन पुल वाहतूकीसाठी बंद करण्यात आले आहे.ब्रिटीश कालीन लहान पुलावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.या रस्ताहुन अत्यावश्यक सेवा फक्त सुरू करण्यात आली आहे.जवळच शहर वाहतूक शाखेच्या पोलीस गाडी वरील ध्वनीक्षेपकाद्वारे लॉक डाऊन चे पालन काटेकोरपणे नागरिकांनी करावे असे आवाहन करण्यात येते आहे.

लॉक डाऊन दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांचे आदेशाने शहरातील विविध पोलीस स्टेशन हद्दीत आज हि कारवाई करण्यात आली आहे.

सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित,अप्पर पोलीस अधिकारी डॉ.राजू भुजबळ, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांचे व मार्गदर्शनाने करण्यात आली आहे.शहरातील विविध पोलीस ठाणे हद्दीतील अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी हि कारवाई केली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like