धुळे : बॉईज कॅन्टीनमध्ये चोरी करणारा गजाआड

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – सुरत नागपूर बायपास चक्करबर्डी जवळील हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारातील मुलांच्या हॉस्टेलच्या कॅन्टीनमध्ये अज्ञात चोरट्यांने प्रवेश करत दीड लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली होती. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करुन एका आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन दिवसात चोरट्याची ओळख पटवून वडजई परिसरातून चोरट्याला अटक केली. जाबिर शहा (रा. वडजाई रोड ता.जि. धुळे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून तेरा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधिक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधिक्षक राजु भुजबळ , धुळे विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे हेमंत पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अनिल पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल रफिक पठाण, पोलीस नाईक प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, गौतम सपकाळे, राहुल सानप, कुणाल पाटील, अशोक पाटील, उमेश पाटील, विलास पाटील, मयुर पाटील, तुषार पारधी, रवि राठोड यांनी केली.
आरोग्य विषयक वृत्त –
या’ घरगुती उपायांनी काळ्या ओठांना बनवा मऊ आणि गुलाबी
पाठदुखी का होते ? जाणून घ्या कारणे, करा हे उपाय
‘या’ गोष्टी फॉलो करा आणि निकालाचे नैराश्य घालवा
या ‘शॉर्टटर्म’ व्यायाम प्रकारांचे अनुभवा ‘लॉंगटर्म’ फायदे

You might also like