जिल्हा पोलिस दलाच्या वतीने शांतता कमिटीची बैठक

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – पोलीस प्रशिक्षण केंद्रात शांतता बैठकीत नाशिक परिक्षेञातील महानिरीक्षक छोरिंग दोरीज यांनी मार्गदर्शन केले. जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था, जातीय सलोखा कायम रहावा. शहरात शांततेचे वातावरण रहावे. देश विविधतेतून नटलेला आहे. सगळ्या धर्माचे, जातीचे लोक राहतात. भारताची एक वेगळी ओळख आहे. शहरात काही दिवसांपासून अशांतता छोट्या छोट्या कारणाहून झाली. परंतू दोन्ही समाजात तेढ निर्माण झाली. परंतू पोलीसांनी कारवाई करत परिस्थिती चांगल्या पध्दतीने हाताळली या बाबत पोलीस दलाचे कौतूक केले.

सोशल मिडीयाला जबाबदार धरणे योग्य नाही. आपण हि तितकेच जबाबदार आहोत. यावर एक छोटी गोष्ट सांगत उपस्थितांना प्रत्येकाला जवाबदारी जाणीव करुन दिली. लहान, मोठ्या कायदा उल्लंघन करणाऱ्यावर आमची नजर आहे. कायदा कोणी हातात घेऊ नये. कायदा हातात घेतला तर कठोर कारवाई केली जाणार कोणताहि भेदभाव केला जाणार नाही, असा इशारा दिला. आपण सारे एक आहोत जातीय सलोखा कायम टिकवत पुढील महिन्यातील येणारे प्रत्येक धर्माचे सण साजरे करु. एकोपा आबाद राखू. पोलीस दल सज्ज आहे असे शांतता कमिटीच्या बैठकीत आव्हान केले.

या बैठकीत व्यासपिठावर जिल्हा पोलीस अधिक्षक विश्वास पांढरे, डाविकडून प्रांतअधिकारी भिमराज दराडे, उपविभागिय पोलीस अधिकारी सचिन हिरे, अप्पर पोलीस अधिकारी डॉ.राजू भूजबळ, श्रीकांत घुमरे, रविंद्र सोनवणे उपस्थित होते. माजी उपमहापौर शव्वाल अन्सारी, वाल्मिक दामोदर, फादर विल्सन रॉड्रिक्स, उमेश चौधरी, बाबा हातेकर सह पोलीस अधिकारी, कर्मचारी, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुञसंचलन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटीलांनी केले