पोलिस अधीक्षक कार्यालयातील महिला कर्मचार्‍याचे घर फोडले, रोख रक्कमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – यशवंत नगरातील महिला कर्मचार्‍याचे घर फोडुन लाखो रुपयांचे सोने व हजारो रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली.

धुळे शहरातील साक्री रोड यशवंत नगरात राहणाऱ्या व जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात कामकाज करणाऱ्या जयश्री शंकर महाले या महिला कर्मचार्‍याचे बंद घराचे दाराचे कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करुन लोखंडी कपाट फोडुन कपाटातील रोख 90,000 हजार रुपये, 12 ते 14 तोळे सोने असा लाखोंचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला आहे.

Dhule

माहिती मिळताच शहर पोलीसांनी घटनास्थळी पहाणी करुन श्वान पथक व फिंगर प्रिंट तज्ञांची मदत घेण्यात आली. श्वान हा रस्त्यातील चौकातच घुटमळत राहिला. चोरटे सीसीटिव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहे. पोलीस त्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहे. उशीरा पर्यत शहर पोलीसांत चोरी बाबत नोंद करण्याचे काम सुरु होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like