धुळे : पानखेड्यात पंक्चर दुकान मालकाचा खुन

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – शिरपुर तालुक्यातील पानखेड गावात रस्त्यावर असलेल्या पंक्चर दुकान चालकाचा खुन. सविस्तर माहिती की पानखेडा गावात पंक्चर दुरुस्ती करणाऱ्या मालकाचा अज्ञात व्यक्तीने मारहाण करुन चेहरा दगडाने ठेचून खुन करण्यात आला.

मृतदेह दोनशे मिटर दुर दुकानापासुन फेकलेला होता. त्याचे नाव नौशाद शाकिर अन्सारी या नावाने ओळख पडली आहे. खुनाची वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरल्याने एकच खळबळ उडाली.हि बाब सकाळी उघडकीस आली.

याबाबत पोलीसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत परिसराची पहाणी केली. अधिक मदत व तपास कामी श्वान पथक,फिंगर प्रिंटतज्ञांनाची मदत घेण्यात आली.पुढील तपासशिरपुर ग्रामिण पोलीस करत आहे.

You might also like