धुळे आरटीओतील कारभाराबाबत अँटी करप्शनच्या पत्रानंतर ‘त्या’अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – धुळे आरटीओ कार्यालयातील कारभाराबाबत लाचलुचपतच्या कार्यालयाने काही गंभीर बाबींचा उल्लेख केला होता. या पत्राची गंभीर दखल घेत धुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यरत असलेल्या अधिकार्यांच्या सेवा तात्काळ इतर कार्यालयात वर्ग करण्यात आल्या आहे. याबाबतचे आदेश परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी काढले आहेत. तर त्यांच्या जागी दुसर्या अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे

सेवा वर्ग केलेल्या अधिकार्‍यांची व त्यांच्या जागी येणार्या अधिकार्‍यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

प्रादेशिक परिवहन कार्यालय, धुळे येथूव इतर कार्यालयात वर्ग करवयाच्या मोटार वाहन निरक्षकांची नावे खालील प्रमाणे :

१) शिरीष पवार प्रापका, मुंबई(मध्य), २) सुभाष सोपान जाधव, प्रापका, मुंबई (पश्चिम), ३) राजेशसिंग ज.गौर, उप प्रापका, बीड, ४) संदिप शां. पाटील, उप प्रापका, रत्नागिरी, ५) सचिन शि. पाटील, उप प्रापका, जालना, ६) परिक्षीत सु. पाटील, प्रापका, मुंबई(मध्य), ७) दिलीप बा. बासिस्कर, प्रापका, मुंबई(पश्चिम), ८) धर्मराज र. पाटील, उप प्रापका,जालना, ९) आभास का. देसाई, प्रापका,मुंबई(मध्य), १०) संजय भि. शेलार, प्रापका, मुंबई(पश्चिम), ११) रविन्द्र मु. बंदरकर, प्रापका,मुंबई(मध्य)

राज्यातील इतर कार्यालयातून प्रादेशिक परिवहन कार्यालय, धुळे कार्यालयात सेवा वर्ग करण्यात आलेल्या मोटार वाहन निरीक्षकांची यादी खालील प्रमाणे :-

१) सौरभ दे. पाटील, प्रापका, नागपूर(शहर), २) संजयकुमार मो. पेंढारकर, प्रापका, नागपूर(ग्रामीण), ३) विजयकुमार सु. महाजन, प्रापका, नागपूर(ग्रामीण), ४) राजेश बा. बोरळे, प्रापका, नागपूर(ग्रामीण), ५) हेमंत म. खराबे, प्रापका, अमरावती, ६) हितेश सु. दावडा, प्रापका, अमरावती, ७) नितीन ना. घोडके, प्रापका, अमरावती, ८) बजरंग ग. कोरावले, प्रापका, लातूर, ९) संदीप सु. शिंदे, प्रापका, लातूर, १०) सुरेश उ. तुरकणे, उप प्रापका, बारामती, ११) अतुल चं. नांदगावकर, उप प्रापका, उस्मानाबाद.

आरोग्यविषयक वृत्त –