धुळे : सातरणे गावात ५७ लाखांचा बनावट खत साठा जप्त

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – तालुक्यातील सातरणे गावात प्रतिबंधीत खताची विक्री सुरु असल्याची माहिती मिळाल्याने भरारी पथकाने खातरजमा केली.  जून महिन्यात तब्बल ५७ लाखांचा खतसाठा जप्त केला होता. याप्रकरणी दोघांविरुध्द पोलिसात तक्रार झाल्याने गुन्हा दाखल झाला.

धुळे तालुक्यातील सातरणे येथे निर्माण फर्टीलायझर प्रा. लि़. येथे प्रतिबंधीत खतसाठा असल्याची माहिती मिळाल्याने लागलीच भरारी पथकाने याठिकाणी तपासणी केली होती. यावेळी सेंद्रीय खतांमध्ये रासायनिक खतांची भेसळ आढळून आली होती. परिणामी यात विविध कंपन्यांचा सुमारे ६३ टन खतांचा साठा जप्त केला होता. या खतांची किंमत ९ लाख ५५ हजार ७४० रुपये इतकी होती.

या प्रकरणी नाशिक येथील उल्हास प्रल्हाद ठाकूर यांनी रितसर धुळे तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात केली होती. त्यानुसार, सोमवारी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास शशांत शंकर गायकवाड प्रॉडक्शन मॅनेजर, अकोला व निर्माण फर्टीलायझर प्रा. लि़. चे मालक यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

आरोग्यविषयक वृत्त

टक्कल पडलेय ? करा हा उपाय, अन्य आजारही होतील दूर

चिकूमुळे वाढते रोगप्रतिकारक शक्ती, हाडेसुद्धा होतात मजबूत

बदामापेक्षा प्रभावशाली फुटाणे, रोज खाल्ल्यास होतील ‘हे’ फायदे

मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे होतात ‘हे’ आजार, अशी घ्या काळजी

वजन पुन्हा वाढू नये यासाठी करा ‘हे’ साधे उपाय

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका