सांगली, कोल्हापूर पुरग्रस्तांसाठी शिवसेना धुळे महानगर शाखेतर्फे मदत

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात झालेल्या पुरहानीमुळे नुकसानग्रस्त परिवाराला आर्थिक मदत करण्यासाठी शिवसेनेने धुळे शहरात मदत फेरी काढली होती. या मदत फेरीतून जमा झालेला १ लाख ११ हजार १११ रुपयांचा मदत निधी पुरग्रस्तांसाठी शिवसेना पक्षाकडे सुपुर्द केला.
शिवसेना पक्षाचे नेते तथा उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते खासदार संजय राऊत यांच्याकडे मदतनिधीचा धनादेश काल रोजी मुंबई येथे सुपुर्द केला. याप्रसंगी शिवसेना संपर्कप्रमुख बबन थोरात उपस्थित होते.

जुलै महिन्यांत सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे १० लाख नागरीकांचे जिवन धोक्यात आले होते. या अतिवृष्टी व पुरामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी होऊन पशुधन व माणसं मृत्युमुखी पडली. या नागरीकांसाठी समाजाच्या सर्वस्तरातून मोठ्या प्रमाणात मदत करण्यात आली. धुळे महानगर शिवसेना शाखेने धुळे शहरात मदतफेरी काढून ८० हजाराहून जास्त रक्कम गोळा केली होती. या रकमेत शिवसैनिकांनी हातभार लावून १ लाख ११ हजार १११ रुपये एकत्र करत शिवसेना पुरग्रस्त मदतनिधी म्हणून पक्षाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्याकडे काल रोजी मुंबई येथे सुपुर्द केले.

याप्रसंगी शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात, सहसंपर्कप्रमुख अतुल सोनवणे, माजी आमदार प्रा.शरद पाटील, जिल्हाप्रमुख हिलाल माळी, महानगरप्रमुख नरेंद्र परदेशी, संजय गुजराथी, माजी जिल्हाप्रमुख भुपेंद्र लहामगे, विधानसभा संघटक डॉ.सुशिल महाजन, विजय भट्टड, युवासेनेचे पंकज गोरे, उपमहानगरप्रमुख देविदास लोणारी, युसुफ हाजी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

सदर मदत निधी गोळा करण्यासाठी प्रथम महापौर भगवान करनकाळ, उपजिल्हाप्रमुख धिरज पाटील, हेमाताई हेमाडे, महेश मिस्तरी, राजेंद्र पाटील, सिद्धार्थ करनकाळ, उपमहानगर प्रमुख प्रफुल्ल पाटील, नंदु फुलपगारे राजेश पटवारी, किरण जोंधळे, संदीप सुर्यवंशी, संदीप चव्हाण, विकास शिंगाडे, विभागप्रमुख ललित माळी, भटू आप्पा गवळी, संजय पाटील, रविंद्र माळी, रामदास कानकाटे, आबा भडागे, महादू गवळी, अरूण लष्कर, कपील लिंगायत, मच्छिंद्र निकम, हेमंत बागुल, नंदू उचाळे आदींसह शिवसैनिकांनी सहकार्य केले.

Visit – policenama.com 

You might also like