Dhule-Solapur Highway Accident | धुळे-सोलापूर महामार्गावर पुलावरुन कार कोसळून भीषण अपघात; चौघे गंभीर जखमी

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – Dhule-Solapur Highway Accident | धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पुलावरुन कार कोसळून अपघात (Dhule-Solapur Highway Accident) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. निपाणी फाट्याजवळील (Nipani Fata) जोड पुलावर औरंगाबादकडे जाणारी कार चालकाचे (Car Driver) कारवरील नियंत्रण सुटल्याने कार पुलावरून कोसळल्याने अपघात झाला आहे. हा अपघात गुरुवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडला. या अपघातात कारमधील चालकासह 4 जण गंभीर जखमी (Seriously injured) झाले आहेत.

 

याबाबत माहिती अशी की, निपाणी फाट्याजवळील जोड पुलावर औरंगाबादकडे जाणारी कार (MH-20 BY 4241) चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार पुलावरून खाली कोसळली आहे. या घटनेबाबत माहिती समजताच महामार्गावर गस्तीवर असलेले वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक शेख (PSI Sheikh) आणि पोलीस हवालदार अशोक बर्डे (Police Constable Ashok Barde), पोलीस नाईक जारवाल (Police Naik Jarwal) व चालक चव्हाण (Driver Chavan) यांनी घटनास्थळी धाव घेतली. (Dhule-Solapur Highway Accident)

 

त्यानंतर पोलिसांनी जखमींना स्थानिकांच्या मदतीने तात्काळ औरंगाबाद (Aurangabad) येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातात कारचा पूर्णपणे चुराडा झाला असून गाडी पुलाच्या खाली कोसळत दूरवर फरफटत गेली आहे.

 

Web Title :- Dhule-Solapur Highway Accident | four people injured in car accident on dhule solapur highway

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा