धुळे : अवैध धंद्दे बंद करण्यासाठी पोलीस अधीक्षक स्वतः ‘अ‍ॅक्टिव्ह’

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात महिन्याभरापासुन सतत चोरी सत्र सुरु आहे. याकरीता जिल्हा पोलीस अधिक्षक व अन्य पोलीस अधिकाऱ्यांनी रात्री गस्त घालुन चोरी सत्रावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यात अवैध धंदे सुरु असल्याने ते त्वरीत बंद व्हावे याकरीता जिल्हा पोलीस अधिक्षक हे स्वतःच सक्रीय झाले आहे.

आज मंगळवारी शहरातील तीन किलो मीटर अंतरावर असलेल्या मोहाडी उपनगरातील आय एस ओ मानाकंन प्राप्त मोहाडी पोलीस ठाणे हद्दीतील अवधान औद्योगिक शिवारा जवळील ढाब्याच्या मोकळ्या जागेत अवैध रित्या डांबर तयार करण्याचा कारखाना सुरु झाल्याची गोपनिय माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक पांढरे यांना मिळाली. त्यांनी तातडीने मिळालेल्या माहितीच्या आधारे आय एस सो मानांकन प्राप्त मोहाडी पोलीस ठाणे हद्दीत ज्या ठिकाणी डांबर तयार करण्यासाठी साहित्य आणले होते तिथे धडक कारवाई केली. त्यावेळी मोकळ्या जागेत एक ट्रक व इलेक्ट्रिक मोटर व डांबर तयार करण्यासाठी लागणारे साहित्य ठेवलेले दिसले. अन्य साहित्यांसह तेथे असलेल्या तीन ते चार जणांना पोलीसांनी पळुन जाताना त्यांना ताब्यात घेतले. लाखो रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी कारवाई करत सहा व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.

1) दिपक कुमार राऊत.
2) समाधान लोटन चौधरी.
3) दिनेश खैरनार
4) छबुलाल पाटील
5) दिनेश पटेल
6) भैरुलाल मिना

या आरोपींना अटक करण्यात आली आहे, यांचे कडुन एकुण 22,292,00 रुपयांचा मुद्देमाल व 300 गोण्या मार्बल पावडर जप्त करण्यात आली आहे.

आय एस ओ मानांकन प्राप्त हद्दीत जिल्हा पोलीस अधिक्षकांनी कारवाई केल्याने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणालेले आहे. परंतु हा माल कोणाचा, जागा कोणाची, कोणाच्या आशिर्वादाने हा व्यवसाय त्या हद्दीत सुरु होता हे प्रश्न अजुन अनुत्तरीत आहे.

या अगोदर बिलाडी रोड जवळील स्टार्च फॅक्टरी समोरील मैदानात अवैधरित्या अशाच प्रकारे धाड टाकुन डांबर तयार करण्याचा कारखानाही उध्दवस्त करण्यात आला होता. उशीरा पर्यत आय एस ओ मानांकन प्राप्त मोहाडी पोलीस ठाण्यात जिल्हा पोलीस अधिक्षकांनी केलेल्या कारवाई बाबत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते.

Visit : policenama.com

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like