धुळे : एसटी-रिक्षाची जोरदार धडक ; दोन ठार, एक जखमी

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – नरढाणा-शिंदखेडा रस्त्यावर एसटी बस आणि रिक्षाची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने दोघांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाले आहेत. मच्छिंद्र ओमकार शिंदे (वय 70), खंडु धना शिल (वय 45) यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. तर भिका पोलाद शिल (वय 45) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी नरढाणा पोलीस ठाण्यात एसटी बस चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  एसटी बस (बीएल ३४४१) हि नरढाणा कडुन शिंदखेडाकडे होळ रस्ताहुन जाताना नरढाणा रोड वरील जुनी पोलीस चौकीसमोर रिक्षा व बसची समोरासमोर जोरदार धडक झाली.  यात रिक्षाचा चेंदामेंदा झाला. रिक्षात तीन प्रवासी होते. अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना नागरीकांच्या मदतीने तातडीने उपचारासाठी ग्रामिण कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दुर्दैवाने उपचारा दरम्यान मच्छिंद्र शिंदे आणि खंडु धना शिल यांचा मृत्यू झाला. जखमी भिका पोलाद शिल याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी संजय मंच्छिंद्र (वय ४५, रा. धमाणे, ता.शिंदखेडा) यांनी नरढाणा पोलीस ठाण्यात बस चालक विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार बस चालकाविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एन. के. पाटील करत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like