धुळे : कर अधिकारी व डॉक्टर मित्रासह चौघांना पिस्तुलाचा धाक दाखवून लुटले

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – धुळे येथील कर अधिकारी आणि त्यांच्या डॉक्टर मित्रांसह चौघांना मोटारसायकलवरील सहा जणांच्या टोळीने पिस्तुलचा धाक दाखवून लुटल्याची घटना मंगळवारी (२६ नोव्हेंबर) रोजी रात्री धुळे रोडवर जानेव ते डांगर गावादरम्यान घडली. यात एक जण जखमी झाला आहे. या लुटारूंनी या चौघांकडून २१ हजार रुपये रोख आणि चौघांचे मोबाईल घेऊन पोबारा केला. या घटनेमुळे खळबळ उडाली असून पोलिस या टोळीचा शोध घेत आहेत.

धुळे येथील कर अधिकारी विजय मगन सोनवणे, दीपक कैलास नांद्रे, नवी मुंबई ठाणे येथील डॉ. व्यंकट गोविंद मेकाळे, नवापूर तालुक्यातील रायपूर येथील अनिल रमेश वळवी हे कारने (क्रमांक एमएच- २९, बीयु- २१४४ ) अमळनेर येथील पैलाड येथून रात्री साडे दहाच्या सुमारास धुळे येथे जात होते. जानवेपासून १ किमी अंतरावर पुढे डांगर गावाच्या अलीकडे दोन मोटरसायकलवर सहा तरुणांनी आपल्या मोटारसायकली आडव्या करून पिस्तुल त्यांच्या दिशेने रोखले व काच उघडण्यास सांगत दगड काचेवर मारून गाडीच्या खिडकीची काच फोडली. त्यामुळे विजय सोनवणे यांचा हाताला व मांडीला जखम झाली.

तुमच्याजवळील सर्व मौल्यावन साहित्य, वस्तू आणि पैसे काढून द्या नाहीतर गोळ्या घालून मारून टाकेल, अशी दोघांनी धमकी दिली. त्यानंतर सोनवणे यांच्याकडील ५ हजार रुपये व एक मोबाईल, नांद्रे यांच्याकडील ४ हजार रुपये व मोबाईल, डॉ. मेकाळे यांचे ९ हजार रुपये व मोबाईल, वळवी यांचे ३ हजार व १ मोबाइल असा एकूण २१ हजार रुपये व ४ मोबाईल हिसकावून पळून गेले. घटनेचे वृत्त कळताच पोलिस निरीक्षक अंबादास मोरे व पोलिसांनी धाव घेतली मात्र आरोपी मिळून आले नाही.

Visit : Policenama.com