धुळे : शितल कॉलनीतील लष्करी जवानाच्या घरात चोरी

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात घरफोडीचे सत्र सुरूच असून काल रात्री (20 जाने.) चोरट्यांनी लष्करी जवानाचे घर फोडून लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना साक्री रोड येथील शितल काॅलनीत घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, लष्करी जवान हरिभाऊ हिवरकर यांचे साक्री रोडवरील शितल काॅलनीत घर आहे. हिवरकर हे पुणे येथे कार्यरत आहेत. घरी त्यांची आई असते. त्या काही कामानिमित्त बाहेर गेल्या असता चोरट्यांनी बंद घराचा फायदा घेत चोरी केली. तसेच त्यांच्या घरात भाड्याने राहणारे भुषण पाटील यांच्या घरीही चोरी केली. पाटील हे देखील काही कामानिमित्त बाहेर गेले होते. चोरट्यांनी सोन्या चांदिचे दागिणे आणि रोख रक्कम असा एकून साडे तीन लाखांचा मुद्देमाल लंपास केला. पाटील घरी आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात येताच शहर पोलीसांना याबाबत माहिती देण्यात आली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फेसबुक पेज लाईक करा –