धुळे : मुलांच्या हॉस्टेलमध्ये चोरट्यांचा डल्ला

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – सुरत-नागपूर बायपास चक्करबर्डी जवळील हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारातील मुलांच्या हॉस्टेलच्या कॅन्टीनमध्ये अज्ञात चोरट्याने प्रवेश करत दीड लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. याप्रकरणी पोलीसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोरट्यांनी कॅन्टीनच्या मागील बाजूच्या अंगणातील दरवाजातून हॉस्टेलच्या कॅन्टीनमध्ये प्रवेश केला. चोरट्यांनी मुलांच्या हॉस्टेलच्या कॅन्टीनमधील गल्ल्यातील साठ हजार रुपये, मंगळसुत्र आणि अन्य साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. आज सकाळी कॅन्टीनचा दरवाजा उघडला असता हा प्रकार उघडकीस आला. कॅन्टीनमध्ये काम करणारे सर्वजण बाजूच्या अंगणात झोपले होते. याचा फायदा घेत चोरट्यांनी दीड लाखांच्या मुद्देमालावर डल्ला मारला.

चोरीची घटना घडल्याचे समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मेडिकल परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असून चोरट्यांचा शोध सुरु केला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

सिने जगत –

VIDEO : भाईजान सलमान खानने ‘दबंग’ स्टाईलने ‘असा’ साजरा केला ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’

‘पद्मावत’ चित्रपटामध्ये रणवीरच्या ‘त्या’ दोन सीन बाबत मोठा खुलासा

पतिला सोडून अभिनेत्री जेनिफर विगेंट राहते आता ‘या’ अभिनेत्यासोबत

Video : ‘फिटनेस क्‍वीन’ दिशा पाटनीने घेतले ‘ते’ इंजेक्शन ; व्हिडीओ सोशलवर ‘चालतो’ नव्हे ‘पळतो’