जि.प. निवडणुकीच्या विजयी रॅलीमध्ये चोरट्यांनी केला ‘हात’ साफ

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात दुपारी जिल्हा परिषद निवडणुक निकाल ऐकण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यावेळी जि.प. उपाध्यक्ष यांचे नातवाईक निलेश दिलीप निकम यांच्या पँटच्या खिशात 18,000 हजार रोख रक्कम होती. त्यांच्या सोबत असलेले सहकारी सचिन सुर्यवंशी यांच्याजवळही 23,000 हजार रुपये रोख रक्कम होती. निकाल घोषित झाल्यावर जल्लोषात दोघे जण दंग झालेले होते. याचाच फायदा घेत चोरट्याने दोघांच्या पँटच्या खिशातून हात चालाखीतून रोकड रक्कम लांबवली.

याच वेळी गर्दीतून एका कार्यकर्त्याचे लक्ष चोरट्याकडे गेले. त्याने आरडाओरड करताच जवळपास असलेल्या नागरिकांनी चटकन निसटणाऱ्या चोरट्याला पकडले. गर्दीत चोरट्याला सगळ्यांनी चांगलाच चोप दिला. याच दरम्यान बंदोबस्ताला तैनात असलेल्या पोलीसांच्या हि बाब लक्षात येताच त्यांनी चोरट्याची नागरीकांच्या तावडीतून सुटका करुन शहर पोलीस ठाण्यात आणले. त्याची चौकशी केली असता तो चोरटा शिरपूरहुन धुळ्यात दाखल झाला होता.

चोरट्यांचे नाव रतन राजाराम वडार, असून तो बोदवड, ता. शिरपूर येथे राहतो. पोलीसांनी त्याची कसून चौकशी केल्यानंतर चोरट्याने त्याचे त्याब्यातील 18,000 हजार रुपये रोख रक्कम चोरल्याची कबूली देऊन ते पोलीसांकडे परत केले. अन्य 23,000 हजार रुपये अजून सापडले नाहीत. रतन वडार विरुध्द शहर पोलीसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलीस करत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like