धुळ्याच्या देवपुरातील साडी सेंटरमधून रोख रक्कम लंपास

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात चोरट्यांचा धुमाकुळ सुरुच आहे. मध्यरात्री दुसऱ्यांदा सपना साडी सेंटर दुकानातून लाखो रुपयांच्या साड्या चोरुन चोरटे पसार झाले आहे.

सविस्तर माहिती की, देवपुरातील प्रमोद नगरातील तुळशीराम नगर रस्त्यावरील स्टेट बँकेजवळ असलेले सपना साडी सेंटर दुकानाचे शटरचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश करुन चोरट्यांनी कपाटातील व रॅक मध्ये खोक्यात ठेवलेल्या विविध प्रकारच्या रंगबेरंगी 100 नग साड्या व नागरीकांनी पिकोफॉलसाठी दिलेल्या 10 ते 15 नग साड्या असा अंदाजे एक ते दिड लाख रुपयांचा माल व रोख 25 हजार रुपये असा माल लंपास केला. या अगोदरही याच सपना साडी सेंटर मधुन सकाळच्यावेळी 70/80 हजार रुपयांच्या साड्या चोरट्यांनी लंपास केल्या होत्या. त्याचा तपास अद्याप लागलेला नाही.

काल रात्री दुकानातून चोरीस गेलेल्या साड्यांबाबत लेखी तक्रार सपना साडी सेंटर दुकान मालक श्रीराम रामलाल जांगीड यांनी पश्चिम देवपुर पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली आहे. उशीरा पर्यंत पश्चिम देवपुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like