भावी वकीलाला मारहाण करत हजार रुपये लुटून चोरटे ‘पसार’ !

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात भर दुपारी चौकात चोरट्यांनी हैदोस घातला आहे. संतोषी माता चौकात दुपारच्यावेळी भावी वकीलाला मारहाण करत एक हजार पन्नास रुपयांची लुट करत तिघे चोरटे पसार झाले.

सविस्तर माहिती की, पुंडलीक जयदेव खेडकर वय.33, रा. नवलाणे यांनी दुपारी मारहाण व लुट बाबत शहर पोलीसांत फिर्याद नोंद केली. रविवारी पुंडलिक खेडकर हे जि. नाशिक येथील ताराबाद गावात नोकरी भरती बाबत गेले होते. तेथील कामकाज आटोपून दुपारी 12.30 वाजता धुळे बस स्थानकात खेडकर परत आले. त्यानंतर नवलाणे गावाला जाण्यासाठी संतोषी माता चौकाकडे परत जात असताना पालेशा महाविद्यालय जवळ रस्त्यावर पाठीमागुन तीन अज्ञात व्यक्तींनी काहीही विचारणा न करता अचानपणे हल्ला चढवत लाथाबुक्यांनी मारहाण करत जखमी करत शर्टचा खिसा फाडुन त्यातील बँकेचे एटीएम कार्ड, रोख 700 रुपये, कँन्डीड कंपनीचा 450 रुपयांचा पेन ड्रईव्ह (लाल रंग)हिसकावुन पसार झाले. यावेळी खेडकर यांनी आरडाओरड केली. परंतु नागरीकांनी मदत केली नाही. चोरटे पसार झाल्यानंतर खेडकर यांनी शहर पोलीस ठाणे गाठत फिर्याद नोंद केली आहे.

देवपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात तृतीय वर्ष कक्षेत शिक्षण घेत आहे अशी माहिती खेडकर यांनी प्रतिनिधी यांना दिली.

Visit : Policenama.com