धुळे : एका रात्रीत तीन ठिकाणी घरफोडी, लाखोंचा ऐवज लंपास

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – धुळे शहरात चोरट्यांनी धुमाकुळ घातला असून शहरात रोज चोरीच्या घटना घडत आहेत. चोरट्यांनी शहरातील तीन ठिकाणी घरफोडी करून लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. रविवारी मध्यरात्री ही घटना घडली असून वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरीक भयभित झाले आहेत. पोलीसांची गस्त कमी झाल्याने चोरट्यांचे फावत आहे. चोरटे कुमार नगर येथे फिरतानाचे सिसीटिव्ही फुटेज व्हायरल झाले.

काल रात्री शहरातील कुमार नगर, सिंचन भवन, क्रांती चौकात चोरट्यांनी धुमाकुळ घातला. कुमारनगरमध्ये राहणारे व्यापारी रमेशलाल खेमाणी यांच्या घराचा कडी कोंडा तोडुन १२ लाख रुपये व सोने, चांदीचे दागिने चोरून नेले.

सविस्तर माहिती अशी की साक्री रोड वरील कुमार नगरमध्ये राहणारे दिऩेश खेमाणी हे घराच्या छतावर कुटुंबसह झोपले होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागच्या बाजुला असलेल्या बंद खोलीचा दरवाजाचे कुलुप तोडुन घरात प्रवेश केला. चोरट्यांनी लोखंडी कपाट तोडून कपाटातील रोख दहा लाख रुपये व सोने- चांदीचे दागिने असा एकुण १६ लाख रुपये ८८ हजार ५००, रुपयांचा माल चोरट्यांने चोरुन नेला. सकाळी सहा वाजता खेमाणी घरात आले असता कपाटातील सामान जमीनीवर पडलेले दिसले. त्यांनी शहर पोलीस ठाण्यात चोरीची माहिती दिली. पोलीसांनी घटनास्थळाची पहाणी केली. घटनास्थळी श्वान पथक व फिंगर प्रिंट तज्ज्ञांची मदत घेण्यात आली.

शहरातील चित्तोड परिसरातील धर्मराज शंकरराव बारी (वय ५०रा. शिवशक्ती कॉलनी) यांच्या क्रांती चौकातील नागराज कॉम्पलेक्स मधील गाळा क्रं.2 मधील भवानी ट्रेडर्स चे दुकानाचे शटर तोडुन दुकानातील तेलाचे पाऊच व रोख रक्कम 6 हजार रुपये असा एकुण 42 हजार 925 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. सकाळी फिरायला जाणाऱ्या त्यांच्या मित्राला दुकानाचे शटर अर्धवट उघडे दिसले. त्यांनी याची माहिती बारी यांना दिली. या बाबत शहर पोलीसांत तक्रार दिली आहे.

साक्री रोड सिंचन भवन मागील राहणारे एस डी शिंपी (रा. प्लॉट नं.3 साई एकता नगर) यांच्या घराचा कडीकोयंडा तोडुन घरातील साहित्य जमीनीवर फेकुन हजारो रुपयांचा माल लंपास केला आहे. शिंदे हे परगावी गेले आहे. त्यांना चोरी बाबत माहिती शेजारी राहणाऱ्या नागरीकांनी दिली. संध्याकाळी ते शहर ठाण्यात येऊन चोरी बाबत नोंद करणार आहे. पुढील तपास पो.नि.गणेश चौधरी करत आहे.

Loading...
You might also like