धुळे : पहिल्याच मेळाव्यात 650 तरुण तरुणींनी दिला परिचय.

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील संतोषी माता चौकातील कल्याण भवनात महाराष्ट्र राज्य विर शैव लिंगायत गवळी समाजाचा प्रथम भव्य वधू-वर पालक परिचय मेळावा संपन्न झाला.

शहरातील संतोषी माता चौकातील कल्याण भावनाथ महाराष्ट्र राज्य वीर लिंगायत गवळी समाज प्रथम वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे उद्घाटन प्रतिमा पुजन व दिपप्रज्वलन करून संस्थापक अध्यक्ष भिमराज घुमरे यांनी केले. यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांचा शाल,नारळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

dhule 2

धुळे, जळगाव ,नंदुरबार ,नाशिक या जिल्ह्यातून समाज बांधव महिला पुरुषांनी सहभाग घेतला.
मेळाव्यात 500 ते 650 वधु-वर परिचयासाठी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य वीरशैंव लींगायात गवळी समाज बहुउद्देशीय संस्था व सर्व गवळी समाज बांधव सहकाऱ्यांच्या वतीने राजेंद्र गढरी यांनी समाज बांधवांना एकत्रीत बोलवून बैठक आयोजित केली होती.यात गवळी समाजातील गरजू व्यक्तींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळाला पाहिजे.समाज हा व्यवसाय निमित्ताने विखूरला आहे.विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण आहे.समाजाच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

dhule 3

आज शनिवारी अध्यक्षयी भाषणात शिवाजी बाचलकर यांनी सांगितले की समाज बांधव एकजूट व्हावा यासाठी धकाधकीच्या जीवनात मुलीचे स्थळ जुळवाजुळवी करता समाजातील बांधवाला भेटीगाठी, मानपानसाठी जादा खर्च येतो. वधु – वर परिचय मेळावा आयोजनात कमी खर्च होईल चांगले स्थळ मिळेल. वेळेची बचत होईल आर्थिक भार कमी होईल. म्हणुन उत्तर महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांची अडचण दूर करण्यासाठी हा सामाजिक उपक्रम राबवण्याचे संस्थेने ठरवले. या प्रथम वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन कल्याण भवनात करण्यात आले आणि आपला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आपल्या सगळ्यांचे सहकार्यानेच हे शक्य झाले आहे.

समाजाच्या हितासाठी असे सामाजिक उपक्रम दरवर्षी राबविण्यात येईल यावेळी व्यासपीठावर महादू उदिकर राजेंद्र गढरी, रमेश दहीहांडे, संतोष अंजी खाने, तानाजी घुमरे, गोपाळ गढरी, मनोहर बोरसे, हनुमंत यादबोले, रामभाऊ गवळी, दिलीप काटकर, मच्छिंद्र नाईक, संगीता उन्हाळे, भारती गवळी, शोभा गवळी, रेखा गवळी, आदी उपस्थित होते.

मेळाव्यात आलेल्या 500 ते 650 तरुण-तरुणींनी आपला परिचय करून दिला. यावेळी समाजातील स्त्री, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र पंगुडवाले यांनी केले.