धुळे : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा डोक्यात दगड घालून खून

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना आज सकाळी साडेनऊच्या सुमारास साक्री तालुक्यातील कोकणगाव शेवडे पाड्यात घडली. मयत पत्नी ही मामाच्या घरी रहायला आली होती. पतीने तिच्या मामाच्या घरी येऊन तिचा खून केला. घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे.

भारतीबाई गोरख चव्हाण (वय-३५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी गोरख एकनाथ चव्हाण याला अटक केली आहे. याप्रकरणी भारतीबाई यांचा मामा सुखदेव काळु गायकवाड (वय-५२ रा. कोकणगाव शेवगे) यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सुखदेव गायकवाड यांची लहान बहिण भारतीबाई हिचे सटाणा तालुक्यातील कातरवेल येथील गोरख चव्हाण याच्याशी १४ वर्षापूर्वी झाले होते. त्यांना एक मुलागा आणि एक मुलगी आहे. गोरख चव्हाण हा काहीही कामधंदा करीत नव्हता. तसेच त्याला दारूचे व्यसन होते. तो नेहमी दारू पिऊन तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करीत होता. पतिच्या रोजच्या त्रासाला कंटाळू त्या मुलांसह दोन महिन्यापूर्वी मामाच्या घरी राहयला आल्या होत्या.

आज सकाळी भारतीबाई या घराबाहेर कपडे धूत होती. त्यावेळी पती गोरख हा पाठिमागून आला. त्याने भारतीबाईच्या डोक्यात मोठा दगड घातला. यामध्ये गंभीर जखमी होऊन तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान, शेतातून पळून जात असताना आरोपी गोरख चव्हाण याला पोलिसांनी अटक केली.

आरोग्य विषयक वृत्त –

कच्ची पपई यकृतासाठी उत्तम, इतरही आहेत अनेक फायदे

ग्रामीण भागातील डॉक्टरांच्या निवृत्तीचे वय वाढवण्याची मागणी

या आजारामुळे २४ वर्षांच्या तरूणावर आतापर्यंत झाल्या ५५ शस्त्रक्रिया

प्रसूतीनंतर या “कारणामुळे” गळतात केस