‘लॉकडाऊन’चा फायदा घेत विदेशी मद्य साठयावर चोरट्यांनी मारला डल्ला

पोलीसनामा ऑनलाइन – देशात लॉक डाऊन परिस्थिती असताना शहरातील रस्ते ओस पडले आहे.चोरटेमात्र याच संधींचे सोने करताना दिसत आहेत. अवधान शिवारातील हॉटेल मध्ये चोरट्यांनी प्रवेश करत हजारों रूपयांचे विदेशी मद्याच्या बाटलीचे खोक्यावर डल्ला मारला.

अवधान शिवार मुंबई आग्रा महामार्गावरील मोहाडी उपनगरातील हॉटेल हि लॉक डाऊन मुळे बंदच आहे.याचाच फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी हॉटेल राजेंद्र परमिट रूम मध्ये विदेशी मद्य साठा ठेवलेल्या आतील खोलीत पाठिमागील तारेची जाळी कापून आत प्रवेश करून खोलीत ठेवलेल्या विदेशी दारू साठा असलेल्या खोक्यात ठेवलेल्या विदेशी मद्य बाटल्यावर डल्ला मारला.यात मात्र चोरट्यांनी गल्ल्यातील रोकड कडे लक्ष दिले नाही. ऑफिसर चॉईस व मॅकडॉल कंपनीचे रम असा एकूण 53,310 रुपयांचा मद्य साठा चोरट्यांनी लंपास केला आहे.

या प्रकरणी व्यावसायिक सुखविंदरकौर हरभजनसिंग पंजाबी यांनी मोहाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

पुढील तपास मोहाडी पोलिस करत आहे