धुळे : मोरशेवडी गावातील विहिरीत उडी मारुन विवाहितेची आत्महत्या

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – तालुक्यातील मोरशेवडी गावातील विहिरीत विवाहितेचा मृतदेह आढळल्याने गावात एकच खळबळ उडाली. शितल दिपक गवळी असे मृत विवाहितेचे नाव आहे. प्राथमिक तपासात शितल यांनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सविस्तर माहिती अशी की, शितल गवळी या कालपासून दिसत नसल्याने नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला परंतु त्या सापडली नाही. आज मंगळवारी सकाळी गावाजवळील एका विहिरी जवळुन दुर्गधी येत आल्याने काही लोकांनी विहिरीत डोकावुन पाहिले असता विहिरीत शितल यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. नागरीकांनी याबाबत तालुका पोलीसांना घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेत विहिर व परिसराची पहाणी करुन नागरीक व नातेवाईकांच्या मदतीने मृतदेह विहिरीतुन बाहेर काढुन शवविच्छेदन कक्षाकडे नेण्यात आला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पोसमार्टम रिपोर्ट आल्यावर अधिक माहिती कळले अशी माहिती तालुका पोलीसांनी नातेवाईकांना दिली. तालुका पोलीसांत घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Visit : policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like