स्टेजवर ‘ढसाढसा’ रडली अभिनेत्री दिया मिर्झा, कार्यक्रमात ‘कौतुक’ परंतु सोशलवर सडकून ‘टीका’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार दिया मिर्झानं नुकतीच एका साहित्य संमलेनात हजेरी लावली. यावेळी परिसंवादात बोलताना तिला अचानक रडू कोसळलं सध्या तिचा हा स्टेजवर रडतानाचा फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी टाळ्या वाजवत संमेलनात तिचं कौतुक केलं मात्र सोशलवर तिच्यावर जोरदार टीका झाली आहे.

जयपूरमधील दिग्गी पॅलेस येथे 23 ते 27 जानेवारी दरम्यान साहित्य संमेलन झाले. यात अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. यात भाग घेणाऱ्या दियानं परिसंवादात हवामान बदलावर भाष्य केलं यावेळी ती ढसाढसा रडली. तरीही ती बोलत होती. हवामान आणीबीणीवर बोलताना हवामान बदलाविषयी चिंता व्यक्त करताना दिया म्हणाली, “कुणाचेही दु:ख व्यथा समजून घेण्यापासून मागे हटू नका. तुमचे अश्रू अजिबात रोखू नका.” दिया रडत असताना एकानं तिला टिश्यू आणून दिले. यावर ती म्हणाली, “धन्यवाद परंतु मला याची गरज नाही.” तिच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांनी जोराजोरात टाळ्या वाजवल्या.

यानंतर दियाचा हा व्हिडीओ सोशलवर प्रचंड व्हायरल होताना दिसला. अनेकांनी तिच्यावर टीका केली. टिश्यू नाकारल्याच्या मुद्द्यावरून एकानं तिला म्हटलं की, “घरात अख्खच्या अख्ख जंगल कापून ठेवलं आहे. इथे म्हणते मला पेपरची गरज नाही. दिवसभर एसयुव्हीमध्ये फिरते. जरा तरी लाज बाळग.”

काहींनी तिला ओव्हर अ‍ॅक्टींगही म्हटलं आहे. एकानं तर सडकून टीका केली आहे. एकानं म्हटलं की, आता खूप लेट झालं आहे. आता पद्मश्री पुढील वर्षी मिळेल.” एकानं फोटो पोस्ट करत कमेंट केली आहे ज्यावर लिहलं आहे की, ओव्हर अ‍ॅक्टींगचे 50 रुपये कट”

https://twitter.com/Liberal_Tiger/status/1221953262623944704

दिया मिर्झा बद्दल बोलायचं झालं तर ती हवामान बदल कार्यकर्ता म्हणून काम करते. प्रदूषाणाविरोधी ती अनेकदा मोहिम राबवताना दिसते. मुंबईतील आरे जंगलातील झाडांच्या कत्तलीविरोधात तिनं उघडपणे निषेध केला होता.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !