मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अॅक्ट्रेस दिया मिर्झा लवकरच थप्पड सिनेमात अभिनेत्री तापसी पन्नूसोबत काम करताना दिसणार आहे. सध्या दियाचं फिल्मी करिअर चांगलं सुरू आहे. दियाच्या खासगी आयुष्यात मात्र खूप चढ उतार आले. पती साहिल सांगा सोबत 11 वर्ष एकत्र राहिल्यानंतर दियाचा मागच्या वर्षी घटस्फोट झाला. यावर दियानं भाष्य केलं आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत दिया म्हणाली, “मला हा त्रास सहन करण्याची शक्ती माझ्या आई वडिलांकडूनच मिळाली आहे. माझं प्रोफेशन मला दु:खी राहण्यासाठी परवानगी देत नाही. माझे आई वडिल 34 वर्षांपूर्वीच वेगळे झाले होते. तेव्हा मी केवळ 4 वर्षींची होते. तेव्हाही मी दु:ख झेललं होतं. आज मी 37 वर्षांची आहे मग हे दु:ख का नाही झेलणार ?”
पुढे बोलताना दिया म्हणाली, “माझ्या निर्णयाचा मला कोणताही पस्तावा नाही. आयुष्यात असे निर्णय घ्यावे लागतात. माझी कोणतीही तक्रार नाही. मी 14 वर्षांची होते तेव्हा पासून ध्यानधारणा करत आहे. माझी प्रत्येक सकाळ बगीचामध्ये जाते. माझ्या घरातही ग्रीनरी असते.”
दियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच दिया अनुभव सिन्हा दिग्दर्शित थप्पड या सिनेमात दिसणार आहे. दियानं काफिरा या वेबा सीरीजमध्ये काम केलं आहे. यानंतर ती आणखी एका वेब सीरीजमध्ये दिसणार आहे. अशीही माहिती आहे की, ती मुगल्स या वेब सीरीजमध्येही झळकणार आहे.