संबित पात्रा विरुद्ध दिया मिर्झा फोटोवरुन दोघांमध्ये ट्विटरवर शाब्दिक बाचाबाची

पोलिसनामा ऑनलाईन टीम – जम्मू काश्मीरमधील सोपोरे जिल्ह्यात सीआरपीएफ जवानांच्या पथकावर झालेल्या दहशतवादी हल्लात एक जवान शहीद झाला तर एका नागरिकाचाही हल्ल्यात मृत्यू झाला. मात्र या हल्ल्यानंतर सोशल मिडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. फोटोमध्ये मरण पावलेल्या आजोबांच्या मृतदेहावर एक तीन वर्षांचा चिमुकला रडत बसल्याचे दिसत आहे. भाजपाचे प्रवक्त संबित पात्रा यांनी हा फोटो ट्विटवरुन शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी उपहासात्मक टोला लगावला आहे. मात्र यावर अभिनेत्री दिया मिर्झा आणि पात्रा यांच्यामध्ये ट्विटवर शाब्दिक बाचाबाची झाली आहे.

पात्रा यांनी शेअर केलेल्या फोटोचे ट्विट कोट करुन रिट्विट करत दियाने या फोटोवर आक्षेप नोंदवला आहे. तुमच्याकडे थोडीशी सुद्धा सहानुभूति उरली नाही का?, असा प्रश्न दियाने विचारला आहे. दियाच्या या ट्विटनंतर पात्रा यांनी तिला उत्तर दिले आहे. हा मॅडम माझ्यात संवेदना (भावना) आहेत, माझ्या सेनेसाठी आहेत. प्रत्येक भारतीय नागरिकासाठी मग तो कोणत्याही धर्माचा का असेना माझ्यात संवेदना आहेत.

मात्र तुमच्याप्रमाणे मी ठराविक ठिकाणी संवेदना नाही दाखवत. मी सिलेक्टीव्ह प्लेकार्ड होल्डर (ठराविक प्रकरणांमध्ये निषेध नोंदवणारा) नाहीय हे लक्षात ठेवा. मी तुमचा चाहता आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा निषेध करणारे पोस्टर तुम्ही हातात पकडून उभे असल्याचे मला पहायचे आहे, असे पात्रा यांनी आपल्या उत्तरात म्हटले आहे.