Diabetes Control : डायबिटीज कंट्रोल करायचा असेल तर सकाळी उठून ‘या’ 6 गोष्टी करा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – डायबिटीजच्या आजरामध्ये सावधगिरी बाळगली नाही तर डोळे, किडनी आणि हृदयावर वाईट परिणाम होऊ लागतो. डायबिटीजला जीवनशैली आणि आहारात बदल करून सहजपणे नियंत्रणात ठेवता येऊ शकते. ज्या वस्तूंचा ग्लायकेमिक इंडेक्स कमी आहे, फायबर आणि प्रोटीन जास्त आहे, त्या सेवन केल्या पाहिजेत. ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी कोणत्या पाच सोप्या टिप्स जाणून घेवूयात…

हे आहेत उपाय

1 थोडी मेथी रात्री भिजवून ठेवा आणि सकाळी तिचे पाणी प्या. मेथीदाण्यात विरघळणारे फायबर भरपूर असते. यामुळे शुगर नियंत्रणात राहाते. शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत होते.

2 रात्री बदाम भिजत टाका. सकाळी ते सेवन करा. यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटीन असतात.

3 प्रोटीन आणि फायबरयुक्त नाश्ता करा. कडधान्य, अंडे यासारख्या वस्तू सेवन करा. जास्त फायबरच्या वस्तू हळुहळु पचन होतात, आणि ब्लड शुगर नियंत्रणात राहाते. ओट्स इडली, मूगडाळ, डाळपराठा यासारखे पदार्थ नाश्त्यात खा.

4 ज्यूसऐवजी फळे सेवन करा.

5 लिंबू पाणी, हर्बल टी सेवन करा. शरीर हायड्रेट राहिल्याने ब्लड शुगर नियंत्रित होते.

6 या वस्तूंच्या नियमित सेवनाने डायबिटीजवर नियंत्रण मिळवता येऊ शकते.

You might also like