Diabetes Causing Foods | केवळ साखर नाही, ‘या’ 5 हेल्दी गोष्टी सुद्धा आहेत डायबिटीजचे मूळ; वेगाने वाढू शकते Blood Sugar
पोलीसनामा ऑनलाइन टीम – Diabetes Causing Foods | मधुमेह (Diabetes) हा एक गंभीर आजार आहे ज्यावर कायमस्वरूपी इलाज नाही. जर एखाद्याला एकदा हा आजार झाला तर त्याला आयुष्यभर या आजारासोबत जगावे लागते. यामध्ये रुग्णाच्या रक्तातील साखर (Blood Sugar) वाढू लागते, ज्यामुळे शरीराच्या अनेक भागांवर परिणाम होतो आणि त्यांच्या कार्यावर वाईट परिणाम होऊ लागतो. यामुळेच मधुमेहाचा त्रास असलेल्यांना शुगरचे रुग्ण म्हटले जाते (Diabetes Causing Foods).
मधुमेह हा इंसुलिनच्या प्रतिकारामुळे होतो, जो शरीरात इंसुलिनचा योग्य वापर होत नाही तेव्हा होतो, हा हार्मोन रक्तातील साखर नियंत्रित (Blood Sugar Control) करतो. इन्सुलिन तयार करणार्या पेशींवर परिणाम करणार्या अनेक गोष्टी आहेत. यामध्ये लठ्ठपणा, धुम्रपान, जास्त मद्यपान आणि ब्लड शुगर वाढवणारे हाय ग्लायसेमिक पदार्थ (Obesity, Smoking, Excessive Drinking And High Glycemic Substances) नियमितपणे खाणे यांचा समावेश होतो.
अनेकदा साखर किंवा रिफाईंड कार्बोहाइड्रेटयुक्त पदार्थ (Sugar Or Refined Carbohydrate Foods) हे मधुमेहाचे मुख्य कारण मानले जाते, परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की रोज खाल्ल्या जाणार्या काही आरोग्यदायी गोष्टींमुळेही मधुमेह होऊ शकतो. जर तुम्हाला मधुमेह टाळायचा असेल किंवा तुम्ही आधीच मधुमेहाचे रुग्ण असाल आणि ब्लड शुगर नियंत्रित ठेवायची असेल तर तुम्ही या गोष्टी टाळल्या पाहिजेत (Diabetes Causing Foods).
1. प्रोटीन (Protein)
प्रोटीन शरीराच्या स्नायूंच्या निर्मिती आणि विकासासाठी उपयुक्त आहेत. समस्या अशी आहे की शरीर प्रोटीनचे साखरेमध्ये विघटन करू शकते, परंतु ही प्रक्रिया कार्बोहायड्रेट कमी करते. मधुमेहाच्या रूग्णांसाठी प्रोटीनचा सर्वोत्तम स्त्रोत निवडणे हे या पदार्थांमध्ये किती फॅट आणि कार्बोहायड्रेट (Fats And Carbohydrates) आहे यावर अवलंबून असते. खरं तर, प्रोटीन पदार्थांमध्ये फॅटचे प्रमाण देखील जास्त असते, ज्यामुळे वजन वाढू शकते आणि हाय कोलेस्ट्रॉल होऊ शकते.
2. फ्रूट ज्यूस (Fruit Juice)
फ्रूट ज्यूस हे निरोगी पेय मानले जातात, परंतु दुर्दैवाने, ब्लड शुगरवर त्यांचा परिणाम सोडा आणि इतर शर्करायुक्त पेयांसारखाच असतो. एवढेच नाही तर फ्रूट ज्यूसमध्ये फ्रक्टोजचे प्रमाणही जास्त असते. फ्रक्टोज इन्सुलिन प्रतिरोध, लठ्ठपणा आणि हृदयरोगाशी संबंधित आहे.
3. ड्राय फ्रूट (Dry Fruit)
फळे व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियमसह (Vitamin C And Potassium) अनेक महत्त्वपूर्ण जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा उत्तम स्रोत आहेत. परंतु जेव्हा फळे सुकतात तेव्हा त्यामधील पाणी निघून जाते, ज्यामुळे या पोषक घटकांचे प्रमाण वाढते. दुर्दैवाने, त्यांच्यातील साखरेचे प्रमाण देखील वाढते. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुम्ही जास्त ड्राय फ्रूट खाऊ नये.
4. दुग्ध उत्पादने (Dairy Products)
दुग्धजन्य पदार्थ प्रोटीनचा चांगला स्रोत आहेत. त्यांच्या सेवनातून कॅल्शियम आणि जीवनसत्त्वेही मिळतात.
पण दुग्धजन्य पदार्थांमध्ये लॅक्टोज नावाची साखर देखील असते.
जर तुम्ही दुग्धजन्य पदार्थ घेत असाल तर तुम्ही कर्बोदक पदार्थांचे सेवन कमी केले पाहिजे.
एका अभ्यासानुसार, हाय फॅटयुक्त दुग्धजन्य पदार्थ कोलेस्ट्रॉलची पातळी (Cholesterol Level) वाढवू शकतात.
5. कॉफी (Coffee)
कॉफी अनेक आरोग्य लाभांशी संबंधीत आहे. मात्र, फ्लेवर्ड कॉफीचे सेवन शुगरच्या रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकते.
अशाप्रकारचे पेये वजन वाढवण्याचे काम करतात. याशिवाय फ्लेवर्ड कॉफीमध्ये कार्बोहायड्रेट भरपूर असते.
तुम्हाला तुमची ब्लड शुगर नियंत्रणात (Blood Sugar Control) ठेवायची असेल आणि वजन वाढण्यापासून रोखायचे असेल, तर अर्धा चमचा साधी कॉफी एक चमचा क्रीमसोबत घ्या.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Diabetes Causing Foods | 5 most healthy foods that can cause diabetes and high blood sugar level
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Dilip Walse Patil | राज ठाकरेंच्या सभेवर गृहमंत्र्यांचे सूचक वक्तव्य, म्हणाले…