Diabetes Causing Foods | केवळ साखर नव्हे, ‘या’ 5 हेल्दी गोष्टी सुद्धा आहेत डायबिटीजचे कारण, वेगाने वाढू शकते Blood Sugar

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Diabetes Causing Foods | मधुमेह (Diabetes) हा एक गंभीर आजार आहे ज्यावर कायमस्वरूपी इलाज नाही. जर एखाद्याला हा आजार झाला तर त्याला आयुष्यभर या आजारासोबत जगावे लागते. यामध्ये रुग्णाची ब्लड शुगर (Blood Sugar) वाढू लागते, ज्यामुळे शरीराच्या अनेक भागांवर परिणाम होतो आणि त्यांच्या कार्यावर वाईट परिणाम होऊ लागतो. यामुळेच मधुमेहाचा त्रास असलेल्यांना शुगरचे रुग्ण (Diabetics) म्हटले जाते (Diabetes Causing Foods).

मधुमेह इन्सुलिन रेसिस्टंटमुळे (Insulin Resistance) होतो. शरीराला रक्तातील साखर नियंत्रित करणारा इंसुलिन हार्मोन (Insulin Hormone) योग्यरित्या वापरता येत नाही तेव्हा मधुमेह होतो. इन्सुलिन तयार करणार्‍या पेशींवर परिणाम करणार्‍या अनेक गोष्टी आहेत. यामध्ये लठ्ठपणा, धूम्रपान, अति प्रमाणात मद्यपान आणि ब्लड शुगर वाढवणार्‍या हाय ग्लायसेमिक पदार्थांचे (High Glycemic Substances) नियमित सेवन यांचा समावेश होतो (Diabetes Causing Foods).

 

अनेकदा साखर (Sugar) किंवा रिफाइंड कार्बयुक्त (Refined Carb) पदार्थ हे मधुमेहाचे मुख्य कारण मानले जाते, परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की रोज खाल्ल्या जाणार्‍या काही आरोग्यदायी गोष्टींमुळेही मधुमेह होऊ शकतो. जर तुम्हाला मधुमेह टाळायचा असेल किंवा तुम्ही आधीच मधुमेहाचे रुग्ण असाल आणि रक्तातील साखर नियंत्रित (Blood Sugar Level Control) ठेवायची असेल तर तुम्ही या गोष्टी टाळल्या पाहिजेत.

 

मधुमेहात या गोष्टी टाळा (Avoid These Things In Diabetes)

1. प्रोटीन (Protein)
प्रोटीन शरीराच्या स्नायूंच्या निर्मिती आणि विकासासाठी उपयुक्त आहेत. समस्या अशी आहे की शरीर प्रोटीनचे साखरेमध्ये विघटन करू शकते, परंतु ही प्रक्रिया कार्बोहायड्रेट (Carbohydrate) कमी करते. मधुमेहाच्या रूग्णांसाठी प्रोटीनचा सर्वोत्तम स्त्रोत निवडणे हे या पदार्थांमध्ये किती फॅट (Fat) आणि कार्बोहायड्रेट आहेत यावर अवलंबून असते. खरं तर, प्रोटीनयुक्त पदार्थांमध्ये चरबीचे प्रमाण देखील जास्त असते, ज्यामुळे वजन वाढू शकते आणि हाय कोलेस्ट्रॉल होऊ शकते.

2. फ्रुट ज्यूस (Fruit Juice)
फ्रुट ज्यूस हे निरोगी पेय मानले जाते, परंतु दुर्दैवाने, रक्तातील साखरेवर त्याचा परिणाम सोडा (Soda) आणि इतर गोड पेयांसारखाच असतो. एवढेच नाही तर फ्रुट ज्यूसमध्ये फ्रक्टोजचे प्रमाणही जास्त असते. फ्रक्टोज इन्सुलिन रेसिस्टंट, लठ्ठपणा आणि हृदयरोगाशी संबंधित आहे.

 

3. ड्राय फ्रुट (Dry Fruit)
फळे व्हिटॅमिन सी (Vitamin C) आणि पोटॅशियमसह (Potassium) अनेक महत्त्वपूर्ण जीवनसत्त्वे (Vitamins) आणि खनिजे (Minerals) यांचा उत्तम स्रोत आहेत.
परंतु जेव्हा फळे सुकतात तेव्हा ती पाणी गमावतात, ज्यामुळे या पोषक घटकांचे प्रमाण वाढते.
दुर्दैवाने, त्यांच्यातील साखरेचे प्रमाण देखील वाढते. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुम्ही जास्त ड्राय फ्रुट खाऊ नये.

 

4. दुग्ध उत्पादने (Dairy Products)
दुग्धजन्य पदार्थ प्रोटीनचा चांगला स्रोत आहेत. त्यांच्या सेवनातून कॅल्शियम आणि जीवनसत्त्वेही मिळतात.
पण दुग्धजन्य पदार्थांमध्ये लॅक्टोज नावाची साखर देखील असते.
जर तुम्ही दुग्धजन्य पदार्थ घेत असाल तर तुम्ही कार्ब्जयुक्त पदार्थांचे सेवन कमी केले पाहिजे.
एका संशोधनानुसार, हाय फॅटयुक्त दुग्धजन्य पदार्थ कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवू शकतात.

 

5. कॉफी (Coffee)
कॉफीचा अनेक आरोग्य फायद्यांशी संबंध आहे. ज्यात मधुमेहाचा कमी धोका याचा देखील समावेश आहे.
मात्र, फ्लेवर्ड कॉफीचे सेवन साखरेच्या रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे वजन वाढते.
याशिवाय फ्लेवर्ड कॉफीमध्ये कार्बोहायड्रेट भरपूर असते.
तुम्हाला तुमची रक्तातील साखर नियंत्रणात ठेवायची असेल आणि वजन वाढण्यापासून रोखायचे असेल,
तर एक चमचा क्रीमसोबत अर्धा चमचा साधी कॉफी घ्या.

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Diabetes Causing Foods | 5 most healthy foods that can cause diabetes and high blood sugar level

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Health Benefits Of Matcha Tea | लवकर करायचे असेल ‘वेट लॉस’ तर ग्रीन टी नव्हे, ‘माचा टी’चा करा वापर, काही दिवसातच दिसेल फरक

 

Petrol Diesel Price Hike Pune | पेट्रोल, डिझेलच्या दरात 6 दिवसात 4.80 रुपयांची दरवाढ

 

High Blood Sugar | पायांवर दिसत असतील ‘हे’ 3 संकेत तर करू नका दुर्लक्ष, वाढलेली असू शकते ‘ब्लड शुगर लेव्हल’