Diabetes Control | डायबिटीजच्या रूग्णांनी झोपण्यापूर्वी करावी ‘ही’ 5 कामे, शुगर राहील कंट्रोल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Diabetes Control | डायबिटिज टाईप 1 (Type 1 Diabetes) असो किंवा टाईप 2 (Type 2 Diabetes), सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. दिवसभराची दगदग, तणाव (Stress) आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे (Wrong Eating Habits) मधुमेहाचा धोका (Risk Of Diabetes) वाढू शकतो. मधुमेह हा एक असा आजार आहे ज्यामुळे इम्युनिटी (Immunity) कमकुवत होते. ब्लड शुगरचे प्रमाण (Blood Sugar Level) वाढल्याने रुग्णाला थकवा (Fatigue) जाणवतो. साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी दिवसभर आहार, व्यायाम आणि साखर (Diet, Exercise and Sugar) तपासण्याची काळजी घेणे आवश्यक आहे (Diabetes Control).

 

मधुमेहाच्या आजारात पेशी इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देत नाहीत. मधुमेहाच्या रुग्णामध्ये जेव्हा इन्सुलिन (Insulin) योग्य प्रमाणात तयार होत नाही, तेव्हा त्याचा परिणाम रुग्णाच्या मेटाबॉलिज्मवरही (Metabolism) होतो. ब्लड शुगरचे प्रमाण वाढल्याने अनेक आजार शरीराला त्रास देऊ लागतात.

 

जर मधुमेही रुग्णांना शुगरवर नियंत्रण (Diabetes Control) ठेवायचे असेल तर झोपण्यापूर्वी काही रूटीनचा अवलंब करा ज्यामुळे ब्लड शुगरचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होईल. येथे आम्ही तुम्हाला झोपण्यापूर्वीच्या काही गोष्टींबद्दल सांगत आहोत, ज्यामुळे तुम्हाला मधुमेह आटोक्यात आणता येईल आणि रात्री चांगली झोप मिळेल.

 

झोपण्यापूर्वी साखर तपासा (Check Sugar Before Sleeping) :
मधुमेही रुग्णांनी ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेवण्यासाठी दररोज साखर तपासणे आवश्यक आहे. झोपेच्या वेळी तुमच्या ब्लड शुगरची तपासणी केल्याने औषधे आणि इतर उपचार ब्लड शुगर लेव्हल पुरेशा प्रमाणात नियंत्रित करत आहेत की नाही हे तुम्हाला आणि तुमच्या डॉक्टरांना कळण्यास मदत होईल. झोपेच्या वेळी तुमची रक्तातील साखर 90 ते 150 मिलीग्राम प्रति डेसीलिटर (mg/dL) दरम्यान असावी.

झोपण्यापूर्वी स्नॅक्स खा (Eat Snacks Before Sleep) :
टाइप 1 आणि टाइप 2 मधुमेह असलेल्या रुग्णांना नेहमी अनुभवले असेल की रात्री 2 वाजता आणि सकाळी 8 वाजता ब्लड शुगर लेव्हल वेगाने वाढू लागते. हार्मोन्स रिलिज झाल्यामुळे, मध्यरात्री आणि सकाळी साखर वाढू लागते. याशिवाय सुद्धा रात्रीच्या वेळी साखर वाढण्यास अनेक घटक कारणीभूत आहेत.

 

मध्यरात्री साखर नियंत्रित करण्यासाठी, झोपण्यापूर्वी हाय फायबर, लो फॅट (High Fiber, Low Fat) नाश्ता घ्या. पनीरसह होल व्हीट क्रॅकर्स किंवा पीनट बटर (whole wheat peanut butter crackers ) सफरचंद (Apple) सर्वोत्तम पदार्थ आहेत. हे पदार्थ ब्लड शुगरचे प्रमाण नियंत्रित करतात. लक्षात ठेवा रात्रीच्या जेवणात जास्त कार्बोहायड्रेट (Carbohydrate) घेऊ नका, नाहीतर वजन वाढू शकते.

 

झोपण्यापूर्वी हे पदार्थ टाळा (Avoid These Foods Before Sleeping) :
झोपण्याच्या काही तास आधी कॅफिन, कॉफी, चॉकलेट आणि सोडा (Caffeine, Coffee, Chocolate and Soda) खाणे टाळा.
हे कॅफिनयुक्त पदार्थ आणि पेये तुमच्या मेंदूला चालना देतात, ज्यामुळे तुम्हाला रात्री लवकर झोप येत नाही आणि रक्तातील साखरेची पातळी प्रभावित होते.

 

रात्रीच्या जेवणानंतर चाला (Walk After Dinner) :
ब्लड शुगरचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी मधुमेहाच्या रुग्णांनी रात्रीच्या जेवणानंतर आणि झोपण्यापूर्वी चालणे आवश्यक आहे.
चालण्याने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते. चालल्याने झोप लवकर येईल.

 

खोलीचे वातावरण ठेवा थंड (Keep a Room Cool) :
मधुमेहाच्या रुग्णांसाठी झोपण्यापूर्वी खोली थंड आणि शांत ठेवा. तुमची खोली थंड, अंधार आणि आरामदायक असावी.
थर्मोस्टॅट 60˚F (15.6˚C) आणि 67˚F (19.4˚C) दरम्यान सेट करा जेणेकरून तुम्ही शांतपणे झोपू शकाल.
खोलीतील प्रकाश मंद करा, खोलीचे पडदे लावा.

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Diabetes Control | diabetes patients follow these 5 steps to control sugar before bed time

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Abhishek Bachchan News | आईच्या एका अटीमुळं अपूर्ण राहिलं अभिषेक बच्चनचं पहिलं प्रेम, जाणून घ्या काय होती ‘ती’ अट

 

Sunny Deol Affair News | ‘या’ प्रसिद्ध सुपरस्टारच्या पत्नीसोबत होतं सनी देओलचं अफेअर

 

Causes And Prevention Of Snoring | घोरण्याच्या समस्येने त्रस्त आहात का?, ‘या’ सोप्या उपायांनी होईल घोरणे कमी