Diabetes | ‘मधुमेह’च्या रूग्णांसाठी अतिशय लाभदायक आहे अश्वगंधा, जाणून घ्या कशी करते शुगर कंट्रोल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मधुमेह (Diabetes) हा असा आजार आहे ज्यामध्ये खाण्यापिण्याकडे लक्ष दिले नाही तर समस्या वाढू शकते. खराब जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी आणि तणाव ही या आजाराची कारणे आहेत. साखरेचे रुग्ण अनेकदा थकवा आणि अशक्तपणाची तक्रार करतात, अशा स्थितीत आहाराकडे लक्ष न दिल्यास त्रास वाढू लागतो. (Diabetes)

 

एका हेल्थकेअर कंपनीने प्रकाशित केलेल्या ’इंडिया फिट रिपोर्ट 2019’ नावाच्या अभ्यासानुसार, 2017 ते 2018 या कालावधीत 45 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये मधुमेहाच्या रुग्णांमध्ये 40 टक्के वाढ झाली आहे.

 

मधुमेहाचे रुग्ण साखर नियंत्रणात (Gugar Control) ठेवण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवतात, तसेच साखर कमी करण्यासाठी औषधे घेतात, तेव्हा त्यांची साखर नियंत्रणात येते. पण तुम्हाला माहित आहे का, आयुर्वेदिक औषधी वनस्पती साखर नियंत्रित करण्याचा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. आयुर्वेदिक औषधी वनस्पती अश्वगंधा (Ashwagandha) साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी खूप प्रभावी आहे. (Diabetes)

 

औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली अश्वगंधा मधुमेहाच्या रुग्णांसाठी अतिशय फायदेशीर मानली जाते. यामध्ये अनेक पोषकतत्वे आढळतात, ज्यामुळे ती केवळ ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेवण्यासाठीच नाही तर इतर अनेक आजारांवरही आराम देते.

आयुर्वेदानुसार अश्वगंधाचे महत्त्व (Importance of Ashwagandha according to Ayurveda) :
अश्वगंधा वनस्पतीच्या मुळामध्ये औषधी गुणधर्म असून त्याचा मज्जासंस्थेवर चांगला परिणाम होतो असे म्हटले जाते.
यामुळेच नैराश्य, चिंता, थकवा, तणाव, निद्रानाश आणि मज्जातंतूंचा थकवा यावर उपचार करण्यासाठी हे उपयुक्त मानले जाते.

मधुमेही रुग्णांसाठी अश्वगंधा गुणकारी (Ashwagandha effective for diabetic patients) :
अश्वगंधा इन्सुलिन स्राव वाढवण्यास मदत करते आणि स्नायूंच्या पेशींमध्ये इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते, त्यामुळे मधुमेहींसाठी अत्यंत फायदेशीर आहे.
अश्वगंधा सेवन केल्यानेही कोरोनाला प्रतिबंध करता येतो. अश्वगंधाचा काढा करूनही तुम्ही घेऊ शकता.
अश्वगंधाच्या नियमित आणि मर्यादित सेवनाने शरीराला खूप फायदा होतो.

 

महिलांसाठी कशाप्रकारे फायदेशीर आहे अश्वगंधा (How Ashwagandha is beneficial for women) :
अश्वगंधा इम्युनिटी मजबूत करते, तसेच तणाव देणार्‍या हार्मोन्सला सुद्धा सामान्य करते.
याच्या सेवनाने महिलांमधील वंध्यत्व दूर होते. अ‍ॅनिमियाचा त्रास असलेल्या महिलांसाठी अश्वगंधाचे सेवन खूप फायदेशीर आहे.

 

(Disclaimer :- वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Diabetes | control diabetes with ayurvedic herbs ashwagandha know its best benefits

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

TET Exam Scam | राज्यातील तब्बल 7800 शिक्षक बोगस? अपात्र उमेदवार पैसे देऊन झाले पास ! शिक्षण विभागात मोठी खळबळ, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले… (व्हिडीओ)

 

Anti Corruption Bureau (ACB) Mumbai | मटक्याच्या केसमध्ये कारवाई न करण्यासाठी 20 हजारांची लाच घेताना API निंबाळकर आणि महमद अली अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

 

Pune Crime | ‘सेंट्रल मिनिस्ट्री ऑफ हौसिंग अँड अर्बन अफेअर’मध्ये नोकरीला असल्याचे सांगून तरुणीला 24 लाखांना गंडा