Diabetes Control | डायबिटीजच्या रूग्णांसाठी इन्सुलिनपेक्षा कमी नाहीत ‘या’ 6 पाच वनस्पती, वाढू देत नाहीत ब्लड शुगर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Diabetes Control | मधुमेह या आजाराच्या रुग्णांची संख्या देशात आणि जगात दिवसेंदिवस वाढत आहे. भारताला मधुमेहाची राजधानी म्हटले जाते. Covid-19 संसर्गानंतर या आजाराच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. मधुमेह हा खराब आहार, बिघडलेली जीवनशैली, लठ्ठपणा आणि तणावामुळे होणारा आजार आहे. या आजारावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. (Diabetes Control)

 

मधुमेहाच्या आजारात स्वादुपिंड पुरेसे इंसुलिन तयार करत नाही किंवा इन्सुलिन तयार करणे थांबवते. अपुर्‍या इन्सुलिनमुळे ब्लड शुगर लेव्हल झपाट्याने वाढू लागते.

 

मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी औषधांसोबतच काही वनौषधींचे सेवन खूप प्रभावी ठरते. भारतातील मधुमेहाच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता आयुर्वेदिक चिकित्सक डॉ. दिक्षा भावसार यांनी इंस्टाग्रामवर काही खास औषधी वनस्पती आणि मसाल्यांचा उल्लेख केला आहे. (Diabetes Control)

 

या औषधी वनस्पती आणि मसाल्यांचे सेवन केल्याने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेवता येते. आपल्या देशात अनेक पारंपरिक औषधी वनस्पती आणि मसाले आहेत जे शरीरासाठी इन्सुलिनपेक्षा कमी नाहीत.

 

त्यांचे सेवन केल्याने सर्दी, फ्लू यांसारख्या मौसमी आजारांपासून मुक्ती मिळते, तसेच मधुमेहही नियंत्रणात ठेवता येतो. कोणते मसाले आणि औषधी वनस्पती शुगर नियंत्रित करतात ते जाणून घेवूयात…

1. गुळवेलचे सेवन करा :
चवीला कडू, गुळवेल रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते, तसेच सर्दी आणि खोकला बरे करते. याचे सेवन केल्याने शुगर लेव्हल नियंत्रणात राहते. हे लिव्हरच्या समस्यांपासून बचाव करण्यासाठी देखील प्रभावी आहे.

 

2. आवळा आणि हळद :
आवळा आणि हळद दोन्ही मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.
आवळा आणि हळद समप्रमाणात मिसळून मधुमेहाच्या रुग्णांना खायला द्या, ब्लड शुगर नियंत्रणात राहते.

 

4. त्रिफळा, मंजिष्ठ आणि गोखशूर यांचे सेवन करा:
तज्ज्ञांच्या मते, त्रिफळा, मंजिष्ठ आणि गोखशूर अशा आश्चर्यकारक औषधी वनस्पती आहेत ज्या लिव्हर आणि किडनी डिटॉक्स करतात.
त्यांच्या सेवनाने मधुमेह नियंत्रित राहतो. त्रिकुट : सुंठ, पिपळी आणि मिरी हे मसाले मधुमेहविरोधी आहेत. हे मसाले चयापचय वाढवतात.

 

5. कडुनिंब आणि गुडमार/बेडकीचा पाला :
या दोन्हीही अप्रतिम, कडू औषधी वनस्पती आहेत ज्या ब्लड शुगर लेव्हल जलद नियंत्रित करण्यासाठी प्रभावी आहेत.

 

6. अश्वगंधा :
ही एक औषधी वनस्पती आहे जी तणाव, थकवा दूर करते आणि प्रतिकारशक्ती सुधारते. तिच्या सेवनाने शुगर नियंत्रणात राहते.

 

Web Title :- Diabetes Control | five effective herbs that can control blood sugar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Rains | पुणेकरांना दिलासा ! खडकवासला धरण प्रकल्पात गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा, एका दिवसात 1 TMC पाणीसाठा वाढला

 

Pune Crime | खळबळजनक ! आळंदी नगराध्यक्षांच्या सुनेची गळफास घेऊन आत्महत्या

 

Ajit Pawar | शिवसेना उद्धव ठाकरे यांचीच ! अजित पवारांकडून वकिलांसोबत झालेल्या चर्चेचा दाखला