Diabetes Control | जर गोड खाल्ल्याने वाढली असेल ब्लड शुगर लेव्हल तर अवलंबा ‘हे’ घरगुती उपाय, तात्काळ कंट्रोल करा डायबिटीज

पोलीसनामा ऑनलाइन टीम – जर तुम्हाला मधुमेह (Diabetes) असेल तर तुम्हाला आयुष्यभर सतर्क राहण्याची गरज आहे. मधुमेहावर नियंत्रण (Diabetes Control) ठेवण्यासाठी तुम्हाला आहार आणि जीवनशैलीची (Diet And Lifestyle) खूप काळजी घ्यावी लागेल. जास्त वेळ उपाशी राहून चालत नाही आणि स्टार्च नसलेले अन्न आहारात समाविष्ट करावे लागते (Home Remedies For Diabetes Control). याशिवाय गोड पदार्थ अजिबात खाऊ नयेत, पण सणासुदीच्या काळात कितीही नियंत्रण ठेवले तरी थोडे जास्त गोड खाल्ले जाते (Diabetes Control).

 

त्यामुळे ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level) वाढते. तुमचा थोडासा निष्काळजीपणा काही वेळा मोठा त्रास देऊ शकतो. अशावेळी मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी रुग्ण औषधांसोबतच काही घरगुती उपायही अवलंबू शकतात. या आयुर्वेदिक गोष्टींचे सेवन करून तुम्ही मधुमेहावर नियंत्रण ठेवू शकता (Natural Home Remedies For Diabetes Control).

 

मधुमेहासाठी आयुर्वेदिक आणि घरगुती उपचार (Ayurvedic And Home Remedies For Diabetes)

1. जांभळाच्या बिया (Java Plum Seeds) –
मधुमेहावरील आयुर्वेदिक उपचारात जांभळाच्या बियांचा वापर केला जातो. यासाठी जांभळाच्या बिया सुकवून बारीक करा. त्याची पावडर बनवा. आता ती सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत घ्या. त्यामुळे मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल (Diabetes Control).

 

2. अंजीराची पाने (Fig Leaves) –
अंजीराची पाने रिकाम्या पोटी चघळल्याने किंवा पाण्यात उकळून प्यायल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो. अंजीरच्या पानांमध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म असतात, जे ब्लड शुगर लेव्हल कमी करण्यास मदत करतात.

3. मेथी (Fenugreek) –
मधुमेहाच्या रुग्णांसाठी मेथी खूप फायदेशीर मानली जाते. मेथीदाणे खाल्ल्याने ब्लड शुगर नियंत्रणात (Blood Sugar Level Control) राहते. यासाठी तुम्हाला एक चमचा मेथीदाणे एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजवावे. सकाळी रिकाम्या ते पाणी प्या. यानंतर अर्धा तास दुसरे काहीही खाऊ नका.

 

4. लसूण (Garlic) –
आयुर्वेदात लसणाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. लसणाचा वापर प्रत्येकाच्या घरात जेवणात होतो. लसणाच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास आणि मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. यासाठी लसणाच्या 2-3 पाकळ्या रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी त्या पाकळ्या चावून खा.

 

5. दालचिनी (Cinnamon) –
दालचिनीचा वापर मसाल्यांमध्ये केला जातो. दालचिनी मधुमेह नियंत्रणातही मदत करते. त्यात मधुमेहविरोधी गुणधर्म आहेत.
दालचिनीचा वापर ब्लड शुगर लेव्हल कमी करण्यास मदत करतो.
यासाठी तुम्ही दररोज अर्धा चमचा दालचिनी पावडरचे (Cinnamon Powder) सेवन करावे.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Diabetes Control | home remedies for diabetes ayurvedic treatment to control blood sugar level

 
Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Piles | मुळव्याधीच्या वेदनांनी असाल त्रस्त तर जाणून घ्या त्याचे कारण, प्रकार आणि घरगुती उपचार

 

Kidney Cure | उन्हाळ्यात का वाढू लागते किडनी स्टोनची समस्या, जाणून घ्या कसा करावा किडनी बचाव

 

Kidney Stone दूर करण्याचे सोपे उपाय, रोज प्या हे 3 प्रकारचे ज्यूस