Diabetes Control Tips | डायबिटीज सोडत नसेल पाठ? तर शुगर कंट्रोल करण्यासाठी जेवणानंतर करा ‘हे’ छोटे काम

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Diabetes Control Tips | डायबिटीज (Diabetes) ची समस्या शरीरात इन्सुलिन (Insulin) च्या कमतरतेमुळे होते. इन्सुलिन शरीरातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित ठेवते, त्यामुळे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते. शुगरची समस्या असेल तर त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण होते, परंतु दररोज काही वेळ चालल्याने (Walk) डायबिटीजवर नियंत्रण ठेवू शकता. जेवल्यानंतर 10 मिनिटे चालत राहिल्यास डायबिटीज नियंत्रणात येऊ शकतो (Diabetes Control Tips).

 

कसा कंट्रोल करावा डायबिटीज?
अन्नामध्ये कार्बोहायड्रेट्स (Carbohydrate) मोठ्या प्रमाणात असतात, त्यामुळे अन्न खाल्ल्यानंतर ब्लड (Blood) ग्लुकोज (Glucose) चे प्रमाण अनेकदा वाढते. जर आपण काही खाल्ल्यानंतर बसलो तर कार्बोहायड्रेट्सपासून बनलेली ऊर्जा शरीरात वापरली जात नाही आणि शुगर (Sugar) लेव्हल अचानक वाढते. अन्न खाल्ल्यानंतर थोडा वेळ चालणे किंवा हलका व्यायाम केला तर आपले शरीर ग्लुकोज वापरते आणि शरीरातील शुगरचे प्रमाण नियंत्रणात राहते. (Diabetes Control Tips)

आहार देखील महत्वाचा
शारीरिक व्यायामाव्यतिरिक्त, आपले खाणे देखील डायबिटीजला मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. जर आपण अशा गोष्टी खाल्ल्या ज्यात जास्त कॅलरीज मिळतात तर ते डायबिटीजसाठी हानिकारक ठरू शकते. डायबिटीज झाल्यास कोणता आहार घ्यावा हे जाणून घेऊया.

जर तुम्हाला डायबिटीज असेल तर तुम्ही हाय ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या गोष्टी खाऊ नये. टरबूज, द्राक्षे आणि पिकलेली केळी यांसारख्या फळांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो, अशी फळे टाळावीत.

तांदूळ, बटाट्यात कार्बोहायड्रेट्सचे जास्त असल्याने ते टाळावे. कोल्ड ड्रिंक्स आणि ब्रेडपासून बनवलेल्या वस्तूही खाऊ नयेत.

किवी आणि आलुबुखार खाणे डायबिटीजमध्ये फायदेशीर आहे.

डायबिटीज असल्यास गोड पदार्थ खाणे पूर्णपणे टाळा. गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही कॅलरी नसलेल्या साखरेपासून पदार्थ बनवू शकता.

डायबिटीजमध्ये जास्त तेलकट आणि मसालेदार खाणे टाळा, असे खाल्ल्याने जास्त कॅलरीज मिळतात आणि चरबी वाढते.

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Diabetes Control Tips | daily routine tips for control diabetes level

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Health Problems Symptoms | सकाळी उठण्याची इच्छा होत नाही, खुप आळस येतो का? मग तुमच्या आरोग्यासाठी व्हा अलर्ट

 

Type 2 Diabetes | टाईप 2 डायबिटीजचे रिस्क फॅक्टर्स आणि बचावाची पद्धती कोणत्या, जाणून घ्या सविस्तर

 

Diabetes Tips | ‘ही’ भाजी पाण्यात उकळून प्यायल्याने वेगाने कमी होईल Blood Sugar, वाढेल इन्सुलिन