Diabetes Control Tips | शुगर कंट्रोल करण्यासाठी ‘हे’ 5 नियम आहेत आवश्यक, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Diabetes Control Tips | मधुमेह (Diabetes) हा एक असा आजार आहे जो खराब जीवनशैलीमुळे (Bad Lifestyle) होतो, ज्यावर नियंत्रण न ठेवल्यास ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level) झपाट्याने वाढू लागते. अयोग्य आहार आणि तणावामुळे (Improper Diet and Stress) होणारा हा आजार बरा करता येत नाही, फक्त त्यावर नियंत्रण ठेवता येते. मधुमेहाला डायबिटिस मिलिटियस (Diabetes Mellitus) असेही म्हणतात (Diabetes Control Tips).

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

 

आहारावर नियंत्रण न ठेवल्यास ब्लड शुगरची पातळी वाढू लागते. ज्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना (Diabetes Patients) अनेक प्रकारचे धोके होऊ शकतात. ब्लड शुगरचे प्रमाण वाढल्याने किडनी, डोळे, फुफ्फुस, हृदय आणि रक्तदाब (Kidney, Eyes, Lungs, Heart and Blood Pressure) वाढू शकतो. टाइप 1 (Type 1 Diabetes) आणि टाइप 2 मधुमेहाचे (Type 2 Diabetes) दोन प्रकार आहेत. भारतात टाइप 2 मधुमेहाचे रुग्ण जास्त आहेत.

 

मधुमेहाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे, कोरोनाच्या काळात (Corona Epidemic) या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. या आजाराची लक्षणे वेळीच ओळखली तर त्यावर बर्‍याच अंशी नियंत्रण मिळवता येते. या आजाराची लक्षणे कोणती आणि कोणते नियम पाळल्यास त्यावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे ते जाणून घेवूयात (Diabetes Control Tips)…

मधुमेहाची लक्षणे (Symptoms Of Diabetes) :

1. वारंवार तहान लागणे (Frequent Thirst)

2. वारंवार भूक लागणे (Frequent Loss Of Appetite)

3. वजन वाढणे किंवा कमी होणे (Weight Gain or Loss)

4. थकवा आणि अशक्तपणा (Fatigue and Weakness)

5. जखमा भरण्यास उशीर (Delay In Wound Healing)

6. फोड किंवा त्वचेच्या समस्या (Blisters or Skin Problems)

7. अंधुक दृष्टी (Blurred Vision)

8. हात आणि पाय सुन्न होणे (Numbness Of Hands And Feet)

9. पाय आणि गुडघे दुखणे (Leg And Knee Pain)

 

मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्याकडून जाणून घेवूयात की शुगर नियंत्रित करण्यासाठी कोणते नियम पाळणे आवश्यक आहे.

 

1. अमली पदार्थांचे सेवन बंद करा (Stop Taking Drugs) :
जर तुम्हाला मधुमेह असेल तर सर्वप्रथम तुम्ही सिगारेट, अल्कोहोल आणि अमली पदार्थांचे (Cigarettes, Alcohol And Drugs) सेवन बंद केले पाहिजे. तंबाखू (Tobacco) आणि मादक पदार्थांच्या सेवनाने शुगरची पातळी वाढते. साखर वाढल्याने कर्करोग, हृदय, फुफ्फुसात समस्या (Cancer, Heart, Lung Problems) निर्माण होऊ शकतात.

 

2. वजन नियंत्रित करा (Control Weight) :
ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेवायची असेल तर वजन नियंत्रित (Weight Control) करा. वाढते वजन हे अनेक आजारांचे मूळ आहे. वजन कमी करून तुम्ही मधुमेहाची तीव्रता कमी करू शकता.

 

3. नियमित व्यायाम करा (Exercise Regularly) :
मधुमेहावर नियंत्रण ठेवायचे असेल तर नियमित व्यायाम करा. शारीरिक हालचाली साखरेवर नियंत्रण ठेवतात. जर तुम्ही व्यायाम करत नसाल तर जेवल्यानंतर चालायला हवे, मधुमेहाचा धोका कमी होईल.

4. या प्रकारचे अन्न टाळा (Avoid This Type Of Food) :
मधुमेहावर नियंत्रण ठेवायचे असेल तर आहारात चरबीयुक्त, तेलकट, तळलेले पदार्थ, साखर, मीठ, मांस, हाय प्रोटीनयुक्त पदार्थ (Fatty, Oily, Fried Foods, Sugar, Salt, Meat, High Protein Foods) टाळा. शुगर कंट्रोल करण्यासाठी डॉक्टरांसोबत डाएट चार्ट (Diet Chart) बनवून त्याचे पालन करा.

 

5. या विशेष पदार्थांचा करा आहारात समावेश (Include These Special Foods In The Diet) :
मधुमेहावर नियंत्रण ठेवायचे असेल तर आहारात हिरव्या भाज्या, फळे, धान्य, सोयाबीन, शेंगा, डाळ, बदाम, अक्रोड, मासे (Green Vegetables, Fruits, Grains, Soy Beans, Legumes, Pulses, Almonds, Walnuts, Fish) इ. चा समावेश करा.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

 

Web Title :- Diabetes Control Tips | diabetic person must follow 5 best rules for diabetes control

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | पगार मागितल्याने अधिकाऱ्याकडून 43 वर्षीय महिलेचा विनयभंग

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचा लेटेस्ट भाव

 

Horoscope | ‘या’ राशीत प्रवास योग तर ‘या’ व्यक्तींसाठी त्रासदायक दिवस; पाहा तुमचं आजचं राशिभविष्य