Diabetes Cure | डायबिटीजच्या रूग्णांच्या पायावर दिसू लागली ‘ही’ 4 लक्षणे तर करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या काय असू शकते कारण

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Diabetes Cure | मधुमेह हा जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे होणारा आजार आहे. ज्यामध्ये ब्लड शुगर लेव्हल झपाट्याने वाढू लागते. रक्तातील ग्लुकोजची पातळी दीर्घकाळ जास्त राहिल्यास शरीरातील अनेक अवयवांचे नुकसान होऊ शकते. रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढल्याने डोळे, रक्तवाहिन्या (Blood Vessel), हृदय आणि किडनी यांचेही नुकसान होऊ शकते. हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आजारामुळे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक होऊ शकतो. (Diabetes Cure)

 

मधुमेहाचा केवळ या अवयवांवरच परिणाम होत नाही, तर रुग्णांच्या पायावरही परिणाम होतो. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, ब्लड शुगर लेव्हल वाढल्याचा परिणाम पायांवरही दिसून येतो. पायांमध्ये अनेक प्रकारच्या समस्या असतात, ज्याकडे रुग्ण सामान्य समस्या समजून दुर्लक्ष करतो.

 

मधुमेही रुग्णांनी शुगर नियंत्रणात ठेवणे तसेच शरीरातील बदलांवर लक्ष ठेवणे आणि डॉक्टरांकडून तातडीने उपचार घेणे महत्त्वाचे आहे. वाढत्या मधुमेहाचा परिणाम पायांचेही नुकसान करू शकतो. ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level) वाढल्यावर पायात काही लक्षणे दिसू शकतात, ती कशी ओळखायची ते जाणून घेऊया. (Diabetes Cure)

 

मज्जातंतूचे नुकसान (Nerve Damage) :
जसजसा मधुमेह वाढत जातो तसतसे पायांच्या मज्जातंतूंचे नुकसान होऊ शकते. जेव्हा पायातील नसा खराब होतात तेव्हा तुम्हाला तुमच्या पायांमध्ये वेदना होऊ शकतात. मज्जातंतूंच्या नुकसानीमुळे, आपल्याला गरम किंवा थंड जाणवत नाही.

 

पायात सुद्धा कसल्याच प्रकारची संवेदना जाणवत नाही. पायांमध्ये संवेदना कमी झाल्यामुळे, पाय दुखणे किंवा कापल्या गेल्यामुळे पाय खराब होतात. यामुळे पायाला गंभीर दुखापत किंवा संसर्ग होऊ शकतो.

खराब रक्ताभिसरण (Poor Blood Circulation) :
पायांना पुरेसा रक्तपुरवठा होत नाही तेव्हा दुसरी समस्या उद्भवते. खराब रक्ताभिसरण जखमा किंवा संसर्ग बरे होण्यापासून प्रतिबंधित करते. या समस्येला पेरिफेरल व्हॅस्कुलर आजार (peripheral vascular disease) म्हणतात. मधुमेही रुग्णांनी दारूचे सेवन केल्यास त्यांच्यासाठी हा त्रास आणखी वाढतो.

 

मधुमेही रुग्णांच्या पायात कोणत्याही प्रकारचा संसर्ग झाल्यास, पायात रक्ताभिसरण कमी झाल्यामुळे संसर्ग बरा होण्यास विलंब होतो.
काही प्रकरणांमध्ये, व्यापक संक्रमण कधीही बरे होत नाही. अशा प्रकारच्या संसर्गामुळे गँग्रीन होऊ शकते.

 

पाय लाल होणे :
मधुमेही रुग्णांच्या ब्लड शुगर लेव्हल वाढली की पायांच्या त्वचेचा रंग नेहमीच लाल असू शकतो.
नेहमी लाल पाय हे मधुमेह वाढण्याचे लक्षण आहे.

 

सुजलेले पाय आणि उबदार पाय :
मधुमेही रुग्णांच्या ब्लड शुगर लेव्हल वाढल्याने रुग्णाचे पाय उबदार राहतात आणि पायाला सूज येते.
मधुमेही रुग्णांनी या समस्यांना हलक्यात घेऊ नये, अन्यथा त्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागू शकते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Diabetes Cure | how can diabetes hurt feet know the 4 symptoms

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Low Blood Sugar | व्हिटामिन-D च्या कमतरतेने होते लो ब्लड शुगर, जाणून घ्या ताबडतोब शुगर लेव्हल वाढवण्यासाठी काय करावे

 

Blood Sugar कंट्रोल करण्यासाठी रोज ‘या’ 3 गोष्टींचे करू शकता सेवन; जाणून घ्या

 

Diabetes Control | डायबिटीजच्या रूग्णांसाठी इन्सुलिनपेक्षा कमी नाहीत ‘या’ 6 पाच वनस्पती, वाढू देत नाहीत ब्लड शुगर