Diabetes Cure | डायबिटीजच्या रुग्णांनी चुकूनही करू नये ‘या’ 5 भाज्यांचे सेवन, वेगाने वाढते Sugar

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Diabetes Cure | मधुमेह (Diabetes) हा एक असा आजार आहे ज्यामध्ये ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level) झपाट्याने वाढते. ब्लड शुगरचे प्रमाण जास्त असल्याने स्वादुपिंड पुरेसे इन्सुलिन (Insulin) तयार करू शकत नाही. ब्लड शुगरचे प्रमाण जास्त काळ राहिल्यास रुग्णाला हृदयविकाराचा झटका, किडनीचे आजार, डोकेदुखी, वजन कमी होणे, अंधुक दृष्टी, अनेक अवयव निकामी होणे अशा अनेक आजारांचा धोका वाढतो (Diabetes Cure). जेव्हा रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढते तेव्हा वारंवार लघवी होते आणि जास्त तहान लागते (Know The 5 Worst Vegetables For People With Diabetes).

 

मधुमेहावर नियंत्रण (Diabetes Control) ठेवायचे असेल तर आहारावर नियंत्रण (Dietary Control) ठेवावे. मधुमेहाच्या रुग्णांच्या आहारात कमी ग्लायसेमिक मूल्य असलेल्या पदार्थांचा समावेश करावा. आहारात कमी कार्बोहायड्रेट आणि फायबर असलेले अन्न शुगरच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करा (Diabetes Cure).

 

हिरव्या भाज्या शुगर नियंत्रित करतात. पण काही भाज्या अशाही असतात ज्या ब्लड शुगरची पातळी झपाट्याने वाढवतात. शुगरची पातळी झपाट्याने वाढवणार्‍या अशाच 5 भाज्यांबद्दल जाणून घेऊया (Let’s Know About 5 Vegetables That Increase Sugar Level Rapidly)

 

1. बटाटे टाळा (Avoid Potato) :
मधुमेहाच्या रुग्णांना ब्लड शुगरचे प्रमाण नियंत्रित (Blood Sugar Level Control) ठेवायचे असेल तर बटाट्याचे सेवन टाळावे. बटाट्यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे मधुमेही रुग्णांनी बटाटे टाळावेत.

2. मका वाढवू शकतो शुगर (Corn Can Increase Sugar) :
मका हे स्वादिष्ट अन्न आहे पण मधुमेही रुग्णांनी त्याचे सेवन कोणत्याही स्वरूपात करू नये. अर्धा कप कॉर्नमध्ये 21 ग्रॅम कार्बोहायड्रेट आणि 2 ग्रॅम फायबर असते. कमी फायबर आणि जास्त कार्बोहायड्रेट घेतल्याने मधुमेही रुग्णांची शुगर झपाट्याने वाढते.

 

3. हिरवी मटार टाळा (Avoid Green Peas) :
शुगर नियंत्रणात ठेवायची असेल तर मधुमेही रुग्णांनी टार टाळावी. ही अशी पिष्टमय भाजी आहे ज्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते.
1 कप मटारमध्ये 20 ग्रॅम कार्बोहायड्रेट असतात, ज्यामुळे शुगर वेगाने वाढते.
मटारमध्ये अँटी न्यूट्रिएंट्स देखील असतात ज्यामुळे साखरेच्या रुग्णांचे पचन बिघडू शकते (Diabetes Cure).

 

4. कांदापात (Onion Leaves) :
100 ग्रॅम कांदापातमध्ये 14 ग्रॅम कार्बोहायड्रेट असते तर 1.8 ग्रॅम फायबर असते.
अशी भाजी ब्लड शुगरची पातळी झपाट्याने वाढवते. कांदापातमुळे सूज आणि गॅस होतो.

 

5. रताळे टाळा (Avoid Sweet Potato) :
रताळे हे बीटा-कॅरोटीनचे स्त्रोत आहेत ज्याचा हाय ग्लायसेमिक इंडेक्स आहे.
त्यात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल झपाट्याने वाढू शकते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Diabetes Cure | know the 5 worst vegetables for people with diabetes

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Worst Foods For Cholesterol | कोलेस्ट्रॉल वाढवतात ‘हे’ 5 फूड्स, आजपासून व्हा दूर

 

White Hair Problem | ‘या’ बियांमुळे पांढरे केस पुन्हा होतील काळे, जाणून घ्या वापरण्याची पद्धत

 

Neem Juice Benefits | उन्हाळ्यात प्या कडुलिंबाचा ज्यूस, रोज प्यायल्याने दूर होतील ‘हे’ आजार; जाणून घ्या