Diabetes | डायबिटीजच्या रूग्णांसाठी लाभदायक आहे का दहीचे सेवन? जाणून घ्या ब्लड शुगर नियंत्रित करण्यासाठी काय खावे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Diabetes | डायबिटीज म्हणजे मधुमेह एक मेटाबॉलिक डिसॉर्डर आहे. जो शरीरात इन्सुलिनच्या कमतरतेने होतो. डायबिटीजच्या रूग्णांना आपल्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असते. कारण, यामुळे शरीरात ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Levels) वाढू शकते. ज्यामुळे अनेक प्रकारच्या गंभीर समस्या होऊ शकतात. (Diabetes)

 

शरीरात अनियमित प्रकारे शुगर लेव्हल वाढणे जीवघेणी ठरू शकते. जगभरात डायबिटिजने 40 कोटीपेक्षा सुद्धा जास्त लोक पीडित आहेत. भारतात सुद्धा सतत डायबिटीजच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. अशावेळी ब्लड शुगरच्या वाढत्या त्रासापासून प्रत्येकाला दूर राहायचे आहे. मधुमेहाच्या रूग्णांना कोणत्या गोष्टींचे सेवन टाळावे ते जाणून घेवूयात. (Diabetes)

 

व्यक्ती जे अन्न खाते, ते पचल्यानंतर शुगर निघते. याच ग्लुकोजने शरीराला ऊर्जा मिळते, ही प्रक्रिया पूर्ण करण्यात इन्सुलिन हार्मोन महत्वाची भूमिका पार पाडते. अशावेळी हेल्दी खाण्या-पिण्याने ब्लड शुगरच्या अनियंत्रित स्तरावर नियंत्रण ठेवता येऊ शकते.

 

धान्य आणि डाळी :
हाय ब्लड शुगर असलेल्या रुग्णांनी दुपारच्या जेवणासाठी अधिक संवेदनशील असले पाहिजे. प्रथिने, पोटॅशियम, फायबर आणि इतर पोषक तत्वांनी मुबलक प्रमाणात डाळ दुपारच्या जेवणात घ्यावी, असे आरोग्य तज्ञ सांगतात.

नाश्त्यात याचा समावेश करा :
नाश्ता (Breakfast) हे दिवसाचे सर्वात महत्वाचे जेवण आहे. डायबेटिसच्या रुग्णांनी नाश्त्यात दलिया, ओटमील, स्मूदी आणि एका वाडग्यात ताजी फळे खाऊ शकता. ज्या फळांमध्ये नैसर्गिक साखर कमी असते ती फळे नाश्त्यात खा. याशिवाय उकडलेले अंडे, सालमन मासे किंवा चिकन ब्रेस्ट खाऊ शकता.

 

दह्याचे सेवन :
दिवसाच्या आहारात दह्याचा समावेश केल्यास मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरेल.
हे कॅल्शियम आणि प्रोटीनसारख्या पोषक आणि प्री-बायोटिक्सने समृद्ध आहे.
प्रोबायोटिक दही लिपिड पातळी कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना हृदयविकाराचा धोका कमी होतो.

 

काय आहे प्रोबायोटिक :
प्रोबायोटिक्स हे जिवंत सूक्ष्मजीव आहेत जे पुरेशा प्रमाणात सेवन केल्यावर अनेक आरोग्यदायी फायदे होतात.
दही (yogurt) हे बॅक्टेरियाच्या मदतीने दुधाला आंबवून तयार केले जाते.
प्रोबायोटिक बॅक्टेरिया प्रोबायोटिक दही बनवण्यास मदत करतात. दुपारच्या जेवणात दही खावे.

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Diabetes | daibetes patient consumption of curd beneficial know what to eat to control blood sugar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Womens Diet | महिलांनी वाढत्या वयाबरोबर स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करणे आवश्यक

Heart Attack In Winter | हिवाळ्यात वाढतो हार्ट अटॅकचा धोका, ‘या’ 5 सवयींनी स्वत:ला वाचवा

Expert Health Advice | एक्सपर्टचा सल्ला : 2022 मध्ये फिट राहण्यासाठी ‘या’ 3 चुका कधीही करू नका, जाणून घ्या टार्गेट गाठण्यासाठी बेस्ट टिप्स