Diabetes ची 4 सर्वात मोठी कारणे, ‘या’ वाईट सवयी आजच सोडा, जाणून घ्या कोणत्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मधुमेह (Diabetes) हा इतका गंभीर आजार आहे की तो एकदा कुणाला झाला की त्याच्याशी संबंधित समस्या आयुष्यभर सोडत नाहीत. मधुमेहाच्या (Diabetes) स्थितीत शरीरात योग्य प्रमाणात इन्सुलिन तयार होत नाही किंवा शरीर त्याचा तितका वापर करू शकत नाही, त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात.

 

मधुमेहाची 4 सर्वात मोठी कारणे
इन्सुलिनची कमतरता अनेक पेशी आणि अवयवांवर परिणाम करते. मधुमेहामुळे हृदयविकाराचा झटका (Heart attack), डोळ्यांची कमकुवतपणा आणि किडनीचे आजार (Kidney) होण्याचा धोका वाढतो.

 

मधुमेहाला जन्म देणारी 4 कारणे

 

1. अनुवांशिक कारण (Genetic disorder)
जगभरात केलेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की जर तुमच्या कुटुंबातील एखाद्याला मधुमेह असेल तर तुम्हाला तो होण्याची शक्यता खूप वाढते.

 

2. अनहेल्दी लाईफस्टाईल (Lifestyle)
तुमचे शरीर नेहमी सक्रिय राहणे खूप महत्वाचे आहे, जे लोक वर्कआउट करत नाहीत त्यांना जुनाट आजार होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे दररोज किमान एक तास व्यायाम (Exercise) करा.

 

3. जास्त गोड खाणे (Eating sweets)
काही लोक जास्त गोड खाण्याचे शौकीन असतात, परंतु त्यांना हे माहित असणे आवश्यक आहे की यामुळे मधुमेहाचा धोका अनेक पटींनी वाढतो. कारण कॅलरी वाढणे हे मधुमेहाचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे गोड पदार्थ मर्यादित प्रमाणात खावेत.

4. लठ्ठपणा (Obesity)
जर तुमचे वजन सतत वाढत असेल तर आजपासूनच व्यायाम सुरू करा कारण वाढत्या लठ्ठपणामुळे शरीरातील ब्लड शुगर लेव्हल (Blood sugar level) नियंत्रित करणे कठीण होते आणि हळूहळू मधुमेहाचा धोका वाढतो.

 

आजच व्हा सावध
तुम्हाला मधुमेह होऊ नये असे वाटत असेल तर आजपासूनच तुमच्या आरोग्याबाबत सावध व्हा.
अनहेल्दी लाइफस्टाइल सोडा आणि निरोगी खाण्याला प्राधान्य द्या.
मधुमेह टाळण्यासाठी, शरीराची हालचाल आवश्यक आहे, ज्यामुळे कॅलरी मोठ्या प्रमाणात बर्न होतात.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

 

Web Title :- Diabetes | diabetes 4 big reasons of unhealthy lifestyle obesity sweet eating genetic disease

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nana Patole | ‘सरकारमध्ये जे चालले आहे त्याला दुरुस्त करण्याची वेळ आली’; सरकार बदलणार की सरकारमध्ये बदल?

 

Breakfast Tips | सकाळी उठून नाश्त्यात खा ‘या’ 2 गोष्टी, होतील जबरदस्त लाभ, अनेक आजार राहतील दूर

 

देशातील ‘या’ 7 मार्गावरून धावणार हाय स्पीड Bullet Train, रेल्वे मंत्रालयाने दिली माहिती, जाणून घ्या रूट