Diabetes | ‘या’ 7 नैसर्गिक गोष्टी डायबिटीजमध्ये ‘रामबाण’, तात्काळ ‘कंट्रोल’ होते ब्लड शुगर; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – डायबिटीज (Diabetes) एक असा आजार (disease) आहे ज्याच्या विळख्यात सापडल्यानंतर रूग्णांना आयुष्यभर संघर्ष करावा लागतो. कारण डायबिटीज हृदयरोग, स्ट्रोक, किडनी डिसीज आणि अंधळेपणासारखे आजार वाढवतो. यासाठी यामध्ये ब्लड शुगर (blood sugar) लेव्हल (sugar level) नियंत्रित ठेवणे आवश्यक असते. जेव्हा शरीर आवश्यक इन्सुलिन तयार करणे बंद करते किंवा त्याचा प्रभावीप्रकारे वापर करू शकत नाही तेव्हा लोकांना डायबिटीज (Diabetes) होतो.

 

ही लक्षणे दिसली तर व्हा सावध
डॉक्टर म्हणतात, जर एखाद्या मनुष्याला खुप जास्त लघवी, थकवा, तहान, अनेकदा भूक लागणे, अस्पष्ट दिसणे किंवा उशीराने जखमी भरणे अशी लक्षणे दिसत असतील तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा.

 

या आहेत त्या 7 वस्तू
जर तुम्ही डायबिटीजने (Diabetes) ग्रस्त आढळलात तर डॉक्टर तुम्हाला औषधांशिवाय खाण्याच्या नैसर्गिक वस्तूंद्वारे सुद्धा ब्लड शुगर नियंत्रित करण्याचा सल्ला देऊ शकतात (how to control diabetes). आज आपण 7 अशा वस्तू जाणून घेणार आहोत ज्या डायबिटीज रूग्णांची ब्लड शुगर नियंत्रणात (blood sugar control)ठेवण्यात रामबाण आहेत…

 

कडूलिंब –
कडूलिंबातील फ्लेवोनॉईड्स, ग्लायकोसाईड आणि ट्रायटरपेनोइड्स नावाचे केमिकल शरीरात ग्लूकोज वाढू देत नाही. डॉक्टर सांगतात दोन वेळा कडूलिंबाची पावडर पाण्यासोबत घेतल्यास लाभ होतो. चहामध्ये मिसळून सुद्धा घेऊ शकता.

 

कारले –
कारल्यामधील चारटिन आणि मोमोर्डिसिन ब्लड शुगरचा स्तर कमी करण्यास मदत करते. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, सकाळी-सकाळी कारल्याचा ज्यूस प्यायल्याने ब्लड शुगर सहज कंट्रोल होऊ शकते. यामध्ये आवळा सुद्धा टाकू शकता.

आले
आले नियमित सेवन केल्याने इन्सुलिन नियंत्रित राहते.

 

जांभुळ –
डायबिटीजवर जांभुळ हे जादुई फळ आहे. हे ब्लड शुगर नियंत्रित करते. यातील जॅम्बोलिन कंपाऊंड ब्लड शुगर कमी करते. इन्सुलिन संवेदनशीलता वाढवते. बिघडलेले फास्टिंग ग्लूकोज सुद्धा सुधारते.

 

मेथी –
मेथी शरीरात ग्लूकोज टॉलरन्स चांगले करते. यातील विरघळणारे फायबर कार्बोहाइड्रेटचे अवशोषण आणि पचन संथ करून ब्लड शुगर कंट्रोल करते. रोज 10 ग्रॅम मेथीचे सेवन केल्याने डायबिटीजच्या समस्या कमी होऊ शकतात. मेथी पावडर किंवा पाण्यात उकळवून घेऊ शकता.

 

दालचीनी –
दालचीनी इंसुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवते. शरीर चांगल्याप्रकारे इन्सुलिनचा वापर करू शकते.
डॉक्टर दिवसात दोन वेळा 250 मिलीग्रॅम दालचीनी घेण्याचा सल्ला देतात. खाण्यापूर्वी हे घेणे लाभदायक ठरते.

 

जिनसेंग –
हे एका वनस्पतीचे मुळे आहे जे प्रामुख्याने उत्तर अमेरिकेत उगवले जाते.
इन्सुलिन सुधारण्यात हे खुप उपयोगी मानले जाते. जांभुळ आणि मेथीप्रमाणे हे सुद्धा शरीराच्या पेशींना इन्सुलिनसाठी सक्रिय बनवते.
डॉक्टर्स हे रोज 3 ग्रॅम घेण्याचा सल्ला देतात. मात्र ब्लड थिनर घेणार्‍यांना याचा कोणताही खास लाभ मिळू शकत नाही.

 

Web Title :- diabetes | diabetes 7 best foods that control your blood sugar level including neem and jamun

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jumbo Covid Hospital Pune | ‘जंबो कोव्हिड हॉस्पीटल ’ बाबत पालकमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय घेणार – रविंद्र बिनवडे, अतिरिक्त पुणे महापालिका आयुक्त

Must Do Before 31 October | 31 ऑक्टोबरपूर्वी ITR फाईल करण्यासोबतच करा ‘ही’ 4 महत्वाची कामे, अन्यथा होईल मोठे नुकसान; जाणून घ्या

Anti Corruption Bureau Nagar | अहमदनगर महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी प्रविण मानकर यांच्यावर अ‍ॅन्टी करप्शनकडून मोठी कारवाई; प्रचंड खळबळ