Diabetes | मधुमेही रूग्णांवर पाय कापण्याची आली वेळ, तुम्ही चुकून देखील या गोष्टींकडे करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – पायाला झालेली जखम मधुमेहामुळे (Diabetes) बरी होत नाही. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये (Diabetic Patients) थोड्याशा निष्काळजीपणामुळे पाय कापण्याची वेळ येते. हे प्रकार जगभर वाढतच चालले आहेत. या प्रकाराबद्दल इंग्लंडमधील एका मधुमेहाच्या रुग्णांच्या संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. लॅन्सेट या मासिकात प्रकाशित झालेल्या एका अहवालात, भारतात तीन रुग्णांपैकी एका रुग्णांची साखर नियंत्रित (Sugar Control) करता येत आहे (Diabetes).

 

मधुमेह (Diabetes) हा आजार हळूहळू रुग्णाचे शरीर पोखरतो. कारण या आजारात रक्तातील साखर नियंत्रित (Blood Sugar Level Control) राहत नाही. त्यामुळे इतर आजार होतात. त्यामुळे मधुमेहाला सायलेंट किलर असे म्हणतात. ब्रिटन सरकारनेही मधुमेहाशी संबधित आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. त्यातील माहिती भारताची चिंता वाढवणारी आहे. ब्रिटनने मधुमेहींच्या पाय विच्छेदनाच्या वाढत्या प्रकारांबद्दल अहवाल प्रकाशित केला आहे. एकाद्या जखमेसंदर्भात रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी जखम ज्या पायावर आहे, तो पाय कापावा लागतो. म्हणजे संबंधित रुग्णाची साखर नियंत्रित नसल्यामुळे असे करावे लागते.

याबाबत आरोग्य तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. ब्रिटन सरकारच्या आकडेवारीवरून १० पैकी एका रुग्णाबाबत हा प्रकार घडतो. डायबकटिस युके या धर्मदाय संस्थेने आपल्या अहवालात म्हटले की, मधुमेहींच्या आरोग्याबाबत घडणारे हे प्रकार खुप चिंताजनक आहेत, हे या आकडेवारीवरून कळते. कोरोना आजाराच्या काळात मधुमेही रुग्णांची योग्य ती काळजी घेतली गेली नाही. या दोन वर्षाच्या काळात वैद्यकीय सेवा विस्कळित झाल्यामुळे अनेकांचे जीव धोक्यात आले आहेत.

 

पाय कापणे टाळता येईल का ? : ब्रिटनच्या ऑफिस फॉर हेल्थ इम्प्रूवमेंट अँड डिझास्टरने (UK Office For Health Improvement And Disaster) तीन वर्षांची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. त्यात असे आढळले की, इंग्लंडमधील १३५ स्थानिक भागांपैकी १३ ठिकाणी पाय विच्छेदनाचे प्रकार खुप जास्त आहेत. हॅरो, युकेमध्ये १० हजार माणसांमागे ३.५ माणसांमध्ये मधुमेह आहे. हे तसे कमी आहे. पण ब्लॅपूल भागात मात्र, हा दर सर्वाधिक १६.८ असल्याचा अंदाज आहे. पाय विच्छेदनाच्या ८० टक्के मधुमेही रुग्णांमध्ये अधिक चांगल्या प्रकारे काळजी घेतली जाऊ शकते.
टाईप १ किंवा टाईप २ मधुमेह (Type 1 Or Type 2 Diabetes) अनेक वर्षे अनियंत्रित असताना
पायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्तप्रवाहाचा अभाव आणि मज्जातंतुंचे नुकसान होते.
त्यामुळे अल्सर आणि इन्फेक्शनचा धोका वाढतो.

डायबेटिस युकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ख्रिस अ‍ॅस्कू म्हणतात, ताजी आकडेवारी ही अधिक चिंतेची बाब आहे.
पण यातील बहेतेक रुग्ण बरे करता येऊ शकतात.
त्यांच्यावर जर चांगले उपचार केले गेले तर यातील बहुतेकांची शस्त्रक्रिया टळेल.

 

रक्तातील साखर नियंत्रित करता येईल (Blood Sugar Can Be Controlled) :
दैनंदिन आहारात गोड खाणे टाळावे.
सकस आहार ठेवावा, त्याबरोबरच नियमित व्यायाम करावा.
जंक फूड, रेड मीट आणि जास्त साखरयुक्त पेयांचे सेवन टाळावे.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Diabetes | diabetes foot amputations high rate fear could be avoided with better care

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा