Diabetes | डायबिटीज रूग्णांनी कधीही करू नयेत ‘या’ 6 चूका, आरोग्य होईल बरबाद; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – डायबिटीज (Diabetes) एक असा आजार आहे जो थेटपणे लाईफस्टाईलशी संबंधित आहे. ब्लड शुगर कंट्रोल (blood sugar control) करणे सोपे काम नाही. कारण यासाठी खाण्या-पिण्यात अनेक प्रकारचे बदल करावे लागतात. खराब जीवनशैली टाईप 2 डायबिटीज (Type 2 diabetes) ला प्रोत्साहन देते.

तर संतुलित डाएट त्यास नियंत्रित करण्यात महत्वाची भूमिका निभावतो. हेल्थ एक्सपर्टनुसार डायबिटीजच्या रूग्णांनी (Diabetes Patient) काही चुका टाळल्या पाहिजेत अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. या चूका कोणत्या ते जाणून घेवूयात…

1. नेहमी सुस्त राहणे (Always being dull) –
सुस्त जीवनशैली आरोग्यासाठी घातक आहे. यामुळे लठ्ठपणा आणि ब्लड शुगर वेगाने वाढते. यासाठी व्यायाम करा, क्रियाशिल राहा.

2. कमी फॅट आणि हाय कार्ब डाएट (Low fat and high carb diet) –
हेल्थ एक्सपर्टनुसार, डायबिटीसच्या (Diabetes) रूग्णांमध्ये हेल्दी फॅट असणे आवश्यक आहे आणि ते नट्स, सीड्स आणि शुद्ध तेलाद्वारे मिळते. सतत कमी फॅट आणि हाय कार्बचा डाएट घेतल्याने गंभीर परिणाम होऊ शकतात.

3. दोन जेवणातील मोठे अंतर (Large distance between two meals) –
जर डायबिटीजचे रूग्ण असाल तर दोन जेवणातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न करा. डाएटमध्ये जास्त कालावधी असेल तर खाण्याचे प्रमाण वाढते. यामुळे ब्लड शुगर सुद्धा वाढते. हेल्थ एक्सपर्टनुसार, या रूग्णांनी थोडा-थोडा वेळाने काहीतरी खाल्ले पाहिजे. दोन जेवणामध्ये थोडे हेल्दी स्नॅक्स खा.

4. खुप जास्त किंवा खुप कमी फळे (Too much or too little fruit) –
अनेक लोकांचा गैरसमज असतो की डायबिटीजच्या (Diabetes) रूग्णांनी फळे खाऊ नयेत. कारण त्यामध्ये नॅचरल शुगर असते. मात्र फळे पूर्णपणे टाळू नका आणि खुप जास्तही खाऊ नका. डायबिटीजमध्ये मर्यादित प्रमाणात फळांचे सेवन केले पाहिजे. फळे हळुहळु चावून खाल्ली पाहिजेत.

5. खुप जास्त तणाव घेणे (Taking too much stress) –
आरोग्यासाठी सर्वात जास्त धोका तणाव घेणे आहे.
हा तुमच्या हार्मोन, मानसिक आणि शारीरीक आरोग्यावर सुद्धा परिणाम करतो.
हेल्थ एक्सपर्ट डायबिटीजच्या रूग्णांना तणावातून पूर्णपणे दूर राहण्याचा सल्ला देतात.
स्टडीजनुसार तणाव ब्लड शुगर वाढवतो आणि हृदयाचे आरोग्य सुद्धा बिघडवतो.

6. पूर्ण झोप न घेणे (Not getting enough sleep) –
झोप आराम देण्याशिवाय शरीराच्या विविध कार्यांना नियंत्रित करते.
हेल्थ एक्सपर्टनुसार, झोपल्यावर शरीराच्या आत बहुतांश हार्मोन्स संतुलित होत राहतात.
इन्सुलिन सुद्धा एक हार्मोनच आहे. यासाठी, डायबिटीजच्या रूग्णांनी चांगली घेणे खुप आवश्यक आहे.

Web Title :- Diabetes | diabetes patient mistakes blood sugar levels diet and lifestyle

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | ‘एक भी पोलीसवाला ढंग का नही है, पैसा कमाने के लिए खडे हो क्या?’ पुण्यात कारचालकाने वाहतूक पोलिसास नेले 800 मीटर फरफटत

Sonia Gandhi | काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख निश्चित; सोनिया गांधींचा नेत्यांना सूचक संदेश

LPG Cylinder Subsidy | स्वयंपाकाच्या गॅस सबसिडीबाबत मोदी सरकारचा नवीन प्लान, जाणून घ्या आता कुणाच्या खात्यात येतील पैसे?