Diabetes च्या रूग्णांनी शरीराच्या या भागातील जखमेकडे करू नये दुर्लक्ष, ताबडतोब करावा उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Diabetes | मधुमेह हा स्वतःच एक गंभीर आजार आहे (Diabetes), तो इतर अनेक आजारांना जन्म देतो, कारण रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Level) वाढल्याचा परिणाम शरीराच्या इतर भागांवरही होतो. जर तुमच्या पायावर किंवा तळव्यावर फोडासारखी खूण दिसली तर ते मोठ्या धोक्याचे लक्षण आहे, कारण घट्ट शूजमुळे फोड आलेले असतीलच असे नाही. सहसा अशी लक्षणे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये आढळतात. या जखमा रोखण्यासाठी उपाययोजना केल्या नाहीत, तर शरीराला खूप त्रास सहन करावा लागू शकतो (Diabetic Foot Ulcer Symptoms).

 

मधुमेहामुळे पायाला जखम
आपण ज्या समस्येबद्दल बोलत आहोत त्याला ’डायबेटिक फूट अल्सर’ म्हणतात, ज्यामध्ये अनेक वेळा जखम इतकी वाढते की त्यातून रक्तस्त्राव सुरू होतो. अशा परिस्थितीत, पीडित व्यक्तीने ही सामान्य जखम मानू नये आणि त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

 

डायबेटिक फूट अल्सर म्हणजे काय?
’डायबेटिक फूट अल्सर’ (Diabetic Foot Ulcer) हा एक असा आजार आहे ज्यामध्ये प्रथम पायाच्या तळव्यावर छोटीशी जखम होते, ज्याकडे लोक सहसा दुर्लक्ष करतात, परंतु हळूहळू ही जखम संसर्गामुळे वाढते आणि समस्या निर्माण होतात. (Diabetes)

 

या अल्सरपासून कसा करावा बचाव?

जर तुम्ही तुमच्या रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Level) राखली तर ’डायबेटिक फूट अल्सर’ (Diabetic Foot Ulcer) सारख्या समस्या टाळता येतील.

जेव्हा रक्तातील ग्लुकोजची पातळी सामान्य असते तेव्हा जखम लवकर बरी होते, उलट साखर वाढली की जखम कमी होण्याऐवजी वाढू लागते.

जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुम्हाला तुमच्या पायांवर लक्ष ठेवावे लागेल.
तुम्हाला जखम, फोड किंवा लाल खूण दिसल्यास ताबडतोब तपासणी करा.

हे सर्वात महत्वाचे आहे की तुम्ही निरोगी आहार आणि चांगली जीवनशैली राखण्यावर लक्ष केंद्रित करा,
कारण येथूनच निरोगी प्रवास सुरू होतो.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Diabetes | diabetic foot ulcer symptoms type 2 diabetes wound in sole feet leg blood sugar level

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

ITR Filing | जर तुमच्याकडे नसेल फॉर्म 16 तरीसुद्धा फाईल करू शकता आयटीआर, जाणून घ्या कशी आहे ही पद्धत

 

Pune Crime | ऑडी खरेदी करण्यासाठी बनावट कागदपत्राद्वारे मिळविले 40 लाखांचे कर्ज; बँक मॅनेरजरसह चौघांवर गुन्हा दाखल

 

White Tea For Weight Loss | ‘हा’ चहा पिल्याने हमखास कमी होईल वजन, चेहर्‍यावरील सुरकुत्या सुद्धा होतील गायब