Diabetes | ब्लड शुगर लेव्हल चेक करण्यापूर्वी तुम्ही सुद्धा करत नाही ना ‘या’ 3 चूका, रिडिंगमध्ये होऊ शकते गडबड; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Diabetes | एका विशिष्ट वयानंतर, डॉक्टर शिफारस करतात की लोकांनी दर 3 महिन्यांनी त्यांची ब्लड शुगर लेव्हल तपासली (Blood Sugar Test) पाहिजे. तर हाय ब्लड शुगर रुग्णांनी म्हणजेच मधुमेहाच्या रुग्णांनी दर महिन्याला आणि गंभीर प्रकरणांमध्ये दर आठवड्याला त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Level) तपासावी. मधुमेह हा एक क्रोनिक डिसीज आहे. यामध्ये ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेवणे खूप महत्वाचे आहे. (Diabetes)

 

जर ब्लड शुगर नियंत्रणात नसेल, तर रुग्णांनी त्यांच्या आहारात आणि जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. मात्र, काही वेळा काही चुकांमुळे टेस्टमध्ये ब्लड शुगर लेव्हलची गडबड होऊ शकते. यामुळे लोकांना माहिती असावे की, ब्लड शुगर टेस्ट करताना कोणती खबरदारी घ्यावी.

 

किती प्रकारे तपासली जाते ब्लड शुगर लेव्हल :
अनेक वेळा मधुमेही रुग्ण त्यांच्या सोयीनुसार घरच्या घरी ब्लड शुगर टेस्ट करून घेतात. यासह लोक दररोज किंवा दर काही दिवसांनी त्यांची ब्लड शुगर तपासतात. (Diabetes)

 

ब्लड शुगर टेस्टचे प्रकार

1. ग्लुकोज मॉनिटर (Glucose Monitor)

2. ब्लड ग्लुकोज मीटर (Blood Glucose Meter)

3. ग्लायसेटेड हिमोग्लोबिन Glycated Hemoglobin (A1C)

 

किंवा रुग्ण कोणत्याही प्रयोगशाळेत जाऊन चाचणी करून घेऊ शकतो. त्याच वेळी, लोक लघवीद्वारे रक्तातील साखरेची पातळी देखील तपासू शकतात.

 

त्याच वेळी, अनेकदा लोक नकळत काही चुका करतात, ज्यामुळे ब्लड शुगरचे प्रमाण प्रभावित होते आणि परिणाम विस्कळीत झाल्याचे दिसून येते. अशा स्थितीत काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे –

ब्लड शुगर तपासाना अशी घ्या काळजी

1. खाल्ल्यानंतर तपासताना
या चाचणीला इंग्रजीमध्ये पोस्ट प्रँडियल ब्लड शुगर टेस्ट म्हणतात. या अंतर्गत अन्न खाल्ल्यानंतर शरीरातील ग्लुकोजची पातळी किती आहे, हे मोजले जाते. यामध्ये जेवणानंतर दोन तासांनी ब्लड शुगर लेव्हल तपासली जाते. मात्र, जेवणानंतर लगेचच ब्लड शुगर तपासणे त्याच्या पातळीवर परिणाम करू शकते.

 

2. पाणी प्यावे की नाही?
अनेक लोक विचार करतात की, ब्लड शुगर तपासण्यासाठी पाणी प्यावे की नाही, तर तज्ञांचे मत आहे की तहानलेले राहिल्याने ब्लड शुगरचे प्रमाण बिघडते. यामुळे तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता भासणार नाही याची काळजी घ्या. मात्र, चाचणीपूर्वी अल्कोहोलचे सेवन टाळा.

 

3. हात धुणे योग्य आहे का?
चेकअपपूर्वी तुमचे हात स्वच्छ नसतील, जसे की खाल्ल्यानंतर तुमच्या हाताला काही लागलेले असेल तर ते धुणे आवश्यक आहे. याचे कारण असे की तुमचे हात घाणेरडे झाल्याने रिडिंग चुकीचे येऊ शकते. आरोग्य तज्ञांनुसार, चाचणीसाठी जे बोट वापरत आहात, ते स्वच्छ करण्यास विसरू नका.

 

चाचणीपूर्वी आणि नंतर दोन्ही बोटे स्वच्छ करा. तसेच, निर्जंतुकीकरणानंतर लगेच सुई टोचू नका, बोट कोरडे होण्याची प्रतीक्षा करा.

 

Web Title :- Diabetes | diabets blood sugar level checkup doing these mistakes there may be disturbances in readings

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Multibagger Stock | तीन महिन्यात ‘हा’ शेयर रू. 5 वरून 129 रुपयांवर पोहचला, गुंतवणुकदारांच्या 50 हजाराचे केले 10.93 लाख रुपये

 

Devendra Fadnavis | किरीट सोमय्यांवरील हल्ल्यानंतर फडणवीसांचा हल्लाबोल; म्हणाले – ‘महाराष्ट्रात लोकशाहीचा मुडदा पाडू नका’

 

Best Multibagger Stocks | वर्षभरात ‘या’ स्टॉकने दिला 115% रिटर्न, ब्रोकरेज फर्मने म्हटले – लवकर खरेदी करा