या टिप्स वापरून मधुमेहावर करा नियंत्रण

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मानवी शरीराला आतून पोखरून काढणारा आजार कोणता असा प्रश्न विचारला तर कोणीही म्हणेल ’एड्‍स’ पण प्रत्यक्षात मात्र एड्स हा आजार केवळ रोगप्रतिकारशक्ती कमी करतो. तर मधुमेह शरीरातल्या प्रत्येक अवयवाला निकामी करतो. २१व्या शतकामध्ये भारतीयांच्या अकाली मरणाला कारणीभूत होणारा रोग कोणता असा प्रश्न विचारला तर सहसा उत्तर येईल , ”कॅन्सर”. प्रत्यक्षात मात्र कॅन्सरमुळे जितके लोक मरतात त्यापेक्षा कितीतरी अधिक लोक माधुमेहामुळे मृत्युमुखी पडतात.

मधुमेह हा आजर प्रत्येकाच्या घराघरामध्ये घुसून मृत्युचे तांडव खेळत आहे. तरी लोकांचे डोळे मात्र काही उघडत नाहीत. २०२५ ते २०५० या काळात प्रत्येक घरातील तिसरा भारतीय मधुमेहाने पिडित असेल अशी शंका आहे. परंतु तशी काळजी घेतली तर हे टाळता येऊ शकत.

मधुमेहावर नियंत्रण करण्यासाठी काही टिप्स
१) गोड पदार्थांपासून लांब रहा. कारण आपल्याला अनेकांनी सांगितलेलं असते कि, आजारपणामध्ये फळ खा. त्यामुळे आपण उन्हाळ्यामध्ये थंड ज्युस पितो. पण या थंड फळांमध्ये फायबरचे प्रमाण अधिक नसते. आणि साखरही अधिक असते. हे मधुमेहाला घातक आहे.

२) सकाळी योग्य डाएट होईल असा फायबरयुक्त नाष्टा घ्या. त्यात तुम्ही ताज्या फळांचा ज्युसही घेऊ शकता. पण त्यात साखर जास्त घालू नका.

३) पाणी जास्त प्या. कारण यामुळे शरीरात पाण्याची कमतरता असली तर अशक्तपणा येतो. त्यामुळे दिवसभर जास्तीत जास्त पाणी प्या.

या सर्व गोष्टींचं तुम्ही कटाक्षाने पालन करा. आणि या सोबत डॉक्टरांचा सल्लाही घ्या. जेणेकरून तुमचा मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होईल.

फेसबुक पेज लाईक करा –