Diabetes Diet | डायबिटीजच्या रुग्णांनी सेवन करावी ‘या’ पीठाची भाकरी, ब्लड शुगर राहील एकदम नियंत्रित

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Diabetes Diet | भारतात मोठ्या प्रमाणात लोक मधुमेहाच्या (Diabetes) समस्येने त्रस्त आहेत. शरीरातील ब्लड शुगरचे प्रमाण (Blood Sugar Level) वाढल्यामुळे मधुमेहाची समस्या उद्भवते. अशावेळी निरोगी जीवनशैलीद्वारे (Healthy Lifestyle) या आजारापासून मुक्ती मिळवू शकता. मधुमेहाच्या रुग्णांनी आहारात प्रोटीन (Protein) आणि फायबर (Fiber) जास्त आणि कार्ब्जचे प्रमाण कमी असलेल्या पदार्थांचे सेवन (Diabetes Diet) केले पाहिजे.

 

मधुमेहाच्या रुग्णांनी आहाराची खूप काळजी घेणे आवश्यक आहे. अशावेळी आहारात ज्वारीचा (Jowar) समावेश करणे फायदेशीर ठरू शकते. ज्वारीचा वापर भाकरी म्हणून करू शकता. गव्हाच्या (Wheat) चपातीऐवजी ज्वारीची भाकरी खाणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप चांगले मानले जाते. ज्वारीचे फायदे जाणून घेवूयात (Benefits Of Jowar) –

 

मधुमेहामध्ये ज्वारीच्या भाकरीचे फायदे (Benefits Of Jowar Roti In Diabetes)

– ज्वारीत हाय डाएट्री फायबर (High Dietary Fiber) असल्याने पचन चांगले होते.

 

हे डाएट्री फायबर हार्मोनल (Hormonal) आणि हृदय (Heart) व रक्तवाहिन्यासंबंधी (Blood Vessels) आरोग्यासाठी महत्वाचे असते.

 

ज्वारीचा जीआय (Glycemic Index) देखील खूप कमी असल्याने रक्तामध्ये ग्लुकोज (Glucose) सोडण्यास गव्हापेक्षा जास्त वेळ लागतो. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्यास प्रतिबंध होतो.

ज्वारी हे प्रोटीन (Protein), आयर्न (Iron), व्हिटॅमीन बी (Vitamin B), डाएट्री फायबर (Dietary Fiber) आणि टॅनिन (Tannin) आणि अँथोसायनिन्स (Anthocyanin) सारख्या अँटिऑक्सिडंट्सचा (Antioxidants) स्रोत आहे. हे अँटिऑक्सिडंट जळजळ कमी करण्यास आणि मधुमेहाच्या रुग्णांच्या शरीरात होणारे नुकसान कमी करण्यास मदत करते.

 

ज्वारीमध्ये ग्लूटेन (Gluten) अजिबात नसते. त्यात असलेल्या अँटिऑक्सिडंट्समुळे हे चांगले धान्य मानले जाते. याच्या काही जातींमध्ये फिनोलिकचे प्रमाण जास्त असते जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर असते. (Diabetes Diet)

 

अनेक अँटिऑक्सिडंट्सचा स्रोत असल्याने, कॅन्सरच्या अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते. विशेषतः कोलन कर्करोगापासून (Cancer).

 

ज्वारी पचायला खूप सोपी आहे. यामध्ये स्टार्चसोबत (Starch) प्रोटीनचे प्रमाणही आढळते. यामुळे पचनक्रिया मंदावते.
त्याद्वारे, ते शरीरात ग्लुकोज सोडण्याचे व्यवस्थापन करते.

 

ज्वारीमध्ये टॅनिन आणि अँथोसायनिन्ससारखे अँटीऑक्सिडंट असतात, जे अन्नातील कॅलरी मूल्य कमी करण्यास तसेच वजन कमी (Weight Loss) करण्यास मदत करतात.

 

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Diabetes Diet | diabetes diet wheat or jawar roti low glycemic index foods best for blood sugar control

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

IND vs PAK | मोठा अनर्थ टळला ! भारतीय क्षेपणास्त्र कोसळल्यानंतर पाकिस्तानही क्षेपणास्त्र डागणार होता, पण…

 

Drumstick Controls Blood Pressure | शेवगा खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित होतो, पोटासह ‘या’ गोष्टींसाठीही फायदेशीर; जाणून घ्या

 

Pune Crime | ‘फ्लॅट आम्हाला विक नाहीतर तुझे हातपाय तोडू’, महिलेला धमकावणाऱ्या पती-पत्नीवर FIR